

Dr. Neelam Gorhe directs SIT investigation into Nashik conversion case.
esakal
पुणे : कामाच्या ठिकाणी महिलांचे सक्तीने धर्मांतर आणि लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार नाशिक शहरात उघडकीस आला आहे. या प्रकरणाची विशेष तपास पथकामार्फत (एसआयटी) सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, असे निर्देश विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी नाशिक पोलिस आयुक्तांना दिले आहेत.