आंळदीत हे काय सुरु आहे? भाविकांची गैरसोय पण, पोलिस, प्रशासनाचे मात्र दुर्लक्षच!

विलास काटे
Sunday, 18 October 2020

घाटावर रोज सकाळपासून रात्रीपर्यंत भिकाऱ्यांची रेलचेल असते. याचबरोबर काम धंदा न करणारी बेकार तरूणाई घाटावर दिवसभर झोपून असतात. अनेकजण अन्नदान करत असल्याने एका जागेवर जेवणाची सोय होते. यामुळे बेकारांच्या संख्येत वाढ झाली. अडीचशे तिनशेहून अधिक बेकार याठिकाणी कायमच आढळतात. त्यापैकी अनेकजण मद्याच्या आहारी गेलेले असतात. मद्य प्याल्यावर शिविगाळ मारामारी नित्याचीच आहे​

आळंदी : प्रशस्त दगडी घाट आणि समोरून दुथडी भरून वाहणारी पवित्र इंद्रायणी हे नयनरम्य चित्र आळंदीत गेल्यावर पाहायला मिळते. मात्र याच दगडी घाटावर आता अस्तावस्त व्यस्त पहूडलेले भिकारी, बेकार तरूणांची फौज, अस्थीविसर्जन, दशक्रिया विधीमुळे होणारी घाण असे विदारक चित्रही दिसते. आता तर गेली काही दिवस भुरट्या चोरांबरोबरच तुमचे पैसे दुप्पट करून देतो म्हणून घाटाच्या दोन्ही तिरावर भाविकांना लुटण्यासाठी टपलेले लाल काळा स्ट्रायकरचा काळा धंदा करणारी तरूणाईची चलती वाढली. घाटावरील चौकीला कुलूप असून बंदोबस्तावर पोलिस नसल्याने इंद्रायणी तिर मद्यपी आणि काळे धंदे करणारांचा अड्डा बनल्याचे चित्र आहे.  

आळंदी राज्यातील प्रमुख तिर्थक्षेत्र आहे. वारकरी मंडळी, यात्रेकरू इंद्रायणी तिरावर स्नानासाठी तसेच दर्शनासाठी सदोदित येतात. मात्र याठिकाणी स्नानासाठी गेलेल्या भाविकांचे कपडे चोरीला जाण्याचे प्रकार सर्रास होतात. आता तर नव्यानेच धंदा अवैध प्रकार घडू लागलाय. गेली काही दिवस इंद्रायणीच्या दोन्ही काठावर लाल काळ्या स्ट्रायकरचा वापर करून भाविकांना लुटण्याचा नवा धंदा सुरू झाला. या ठिकाणी दामदुप्पट रक्कम करू देतो असे सांगून लुटले जाते. याउपरही दादागिरीही काळा धंदा करणाऱ्या मंडळींकडून केली जाते.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

घाटावर रोज सकाळपासून रात्रीपर्यंत भिकाऱ्यांची रेलचेल असते. याचबरोबर काम धंदा न करणारी बेकार तरूणाई घाटावर दिवसभर झोपून असतात. अनेकजण अन्नदान करत असल्याने एका जागेवर जेवणाची सोय होते. यामुळे बेकारांच्या संख्येत वाढ झाली. अडीचशे तिनशेहून अधिक बेकार याठिकाणी कायमच आढळतात. त्यापैकी अनेकजण मद्याच्या आहारी गेलेले असतात. मद्य प्याल्यावर शिविगाळ मारामारी नित्याचीच आहे. दुसरीकडे कोरोनामुळे पुणे पिंपरीहून अनेक मृतांचे नातेवाईक शहरात धार्मिक विधीस मर्यादा असल्याने आळंदीला पसंदी देतात. सकाळी सहा वाजल्यापासून दुपारी चारपर्यंत अस्थीविसर्जन केले जाते. अस्थी बरोबर कपडे, निर्माल्य, फोटो नदीत फेकले जातात. घाटावर तर अस्थीविसर्जनामुळे कचरा होतो. पालिका आणि पोलिस यांच्याकडून यावर कोणतीही कारवाई केली जात नसल्याने गेल्या दोन महिन्यात प्रमाण वाढले.

रात्रीच्या वेळी तर रोज मारामाऱ्या होतात. भाविकांचे मोबाईल हिसकावून घेतले जात आहे. घाटावर आळंदी पोलिसांनी पोलिस चौकी उभारली. मात्र कायमच चौकीला कुलूप लावलेले असते. यामुळे घाटावर, तसेच इंद्रायणी स्नानाला जर जायचे झाले तर कधी काय चोरी होईल सांगता येत नाही. त्यातच गुन्हेगार, चोरांचा वावर असल्याने इंद्रायणी हा काळा धंदा करणारांचा अड्डा बनला आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

 इंद्रायणी आणि घाटाचे पावित्र राखण्यासाठी........ 
१) बाहेरून येणाऱ्या लोकांचे अस्थी निर्माल्य विसर्जनावर बंदी
२) मद्यपी आणि बेकार लोकांना हटविणे.
३) भिकाऱ्यांसाठी शेल्टर होमची आवश्यकता.
४) घाटाची नियमित स्वच्छता.
५) घाटावरील पोलिस चौकी दिवस रात्र सुरू ठेवणे.
६) घाटावर बेशिस्त वागणाऱ्यांना सुचित करण्यासाठी ध्वनिक्षेपक यंत्रणा.
७) कपडे धुणे आणि वाहने आणण्यास बंदी.
८) घाटावर येणा-या मार्गावर लोखंडी कुलूपबंद गेट उभारणे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Problems to devotees of black trades in Alandi