
डॉ. लक्ष्मी राव यांनी मध्यवर्ती मधुमक्षिका संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या विविध योजना, मधुमक्षिका पालन, रॉयल जेली उत्पादन तंत्रज्ञान व प्रक्रिया,साठवणूक या विषयी मार्गदर्शन केले
नारायणगाव : ग्रामीण भागातील शेतकरी, महिला गटांसाठी मधुमक्षिका पालन व मध निर्मिती व्यवसाय फायदेशीर आहे.या व्यवसायासाठी शासन सुमारे ऐशी टक्के अनुदान देते.प्रशिक्षण करणाऱ्या शेतकऱ्यांना मध संकलन पेट्या दिल्या जातात. पौष्टिक व औषधी असल्याने राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बाजार पेठेत मध व मध पोळ्यात अल्प प्रमाणात तयार होणाऱ्या रॉयल जेलीला मोठी मागणी आहे.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
अशी माहिती मध्यवर्ती मधुमक्षिका संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या सहाय्यक संचालिका डॉ. लक्ष्मी राव यांनी दिली. कृषि विज्ञान केंद्र (के.व्ही.के) नारायणगाव व मध्यवर्ती मधुमक्षिका संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे यांच्यावतीने मध निर्मिती, रॉयल जेली उत्पादन तंत्रज्ञान व प्रक्रिया या पाच दिवसीय प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. शिबीराचे उदघाटन कृषि विज्ञान केंद्राचे अध्यक्ष अनिल मेहेर यांच्या हस्ते झाले.या वेळी ग्रामोन्नती मंडळचे अध्यक्ष प्रकाश पाटे, केव्हीकेचे वरिष्ठ शास्त्रज्ञ प्रशांत शेटे, डॉ. दत्तात्रय गावडे, श्वेता वायाळ, राहुल काळे आदी मान्यवर, जुन्नर, आंबेगाव व खेड तालुक्यातील वीस मधुमक्षिका पालक शेतकरी, महिला बचत गटातील महिला, युवक-युवती उपस्थित होते.
आईच निघाली सव्वा महिन्याच्या मुलीची मारेकरी
डॉ. लक्ष्मी राव यांनी मध्यवर्ती मधुमक्षिका संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या विविध योजना, मधुमक्षिका पालन, रॉयल जेली उत्पादन तंत्रज्ञान व प्रक्रिया,साठवणूक या विषयी मार्गदर्शन केले .मेहेर म्हणाले की, ''मधुमक्षिका पालन करताना मधुमक्षिकांचा उपयोग मध निर्मिती बरोबर परपरागीकारणासाठी होतो. यामुळे फळ धारणा होण्यासाठी मदत होऊन शेती उत्पादनात वाढ होते.''
डॉ. दत्तात्रय गावडे यांनी परिसरामध्ये आढळणार्या मधुमक्षिका, प्रकार व त्यांचे मानवी जीवनातील महत्व,मधुमक्षिकांचा वापर करून शेतकर्यांच्या उत्पादनात कशा प्रकारे वाढ होईल या बाबत मार्गदर्शन केले.
बारामतीतील वडगावच्या पोलिसांवर फलटणमध्ये आरोपींकडून गोळीबार
डॉ. दत्तात्रय गावडे( पीक संरक्षण शास्त्रज्ञ): मध पोळ्यात आढळणारा रॉयल जेली हा पांढरट पिवळसर घट्ट पदार्थ आहे.पाणी, प्रथिने, साखर, स्निग्ध पदार्थ, खनिजे याबरोबरच जीवनसत्त्वे आणि बायोप्रोटिन्स यासारखे उपयुक्त अन्नघटक रॉयल जेलीत असतात. प्रति दिन दोनशे मिलीग्रॅम रॉयल जेली मानवी शरीरास आवश्यक आहे. मधमाश्या आपल्या अळ्यांना तसेच राणी माशीला खाऊ घालण्यासाठी पोळ्यात रॉयल जेली तयार करतात.