
सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने प्रत्येक महिन्याला कोरोनावरील लशीचे सात ते आठ कोटी डोस तयार केले आहेत. या लशीचे भारताप्रमाणेच परदेशातही वितरण करण्यात येईल. सध्या याचेच नियोजन आखले जात आहे, अशी माहिती कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पूनावाला यांनी दिली. भारताप्रमाणेच परकी देशांना नेमके किती डोस द्यायचे याचे नियोजन आम्ही आखत आहोत, यासाठीचा आराखडा आरोग्य मंत्रालयाने तयार केला आहे.
पुणे - सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने प्रत्येक महिन्याला कोरोनावरील लशीचे सात ते आठ कोटी डोस तयार केले आहेत. या लशीचे भारताप्रमाणेच परदेशातही वितरण करण्यात येईल. सध्या याचेच नियोजन आखले जात आहे, अशी माहिती कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पूनावाला यांनी दिली. भारताप्रमाणेच परकी देशांना नेमके किती डोस द्यायचे याचे नियोजन आम्ही आखत आहोत, यासाठीचा आराखडा आरोग्य मंत्रालयाने तयार केला आहे. लशीची वाहतूक अधिक वेगाने व्हावी म्हणून खासगी भागधारकांच्या ट्रक, व्हॅनचा आधार घेतला जाणार असून, शीतगृहांची व्यवस्थाही करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्र राज्याला लस वितरण करताना केंद्र सरकारने घेतला आखडता हात
जगातील अनेक देशांकडून कोरोनावरील लशीबाबत देशाच्या पंतप्रधान कार्यालयाकडे विचारणा होऊ लागली असून या सगळ्या देशांना सीरम इन्स्टिट्यूटकडून लशीचा पुरवठा करण्यात येईल असे ते म्हणाले. आम्ही सगळ्यांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करत आहोत. आम्हाला आमचे लोक आणि देशाची काळजी घ्यावी लागेन. आफ्रिका आणि दक्षिण अमेरिकेलाही लस पुरविण्याचा आमचा प्रयत्न आहे.
राज्याच्या वेगवेगळ्या भागात लशीसाठी शीतगृहे सज्ज
दोनशे रुपये एवढ्या दराने आम्ही एक कोटी एवढे डोस भारत सरकारला देणार आहोत. केंद्र सरकारच्या विनंतीनंतर सामान्य माणसाला आधार देण्यासाठी आम्ही हा निर्णय घेतला आहे. सामान्य माणूस, गरीब लोक, आरोग्य क्षेत्रामध्ये काम करणारे कामगार आदी घटकांना आधार देण्यात येईल. खासगी बाजारपेठेत आम्ही एक हजार रुपयांना या लशीची विक्री करणार आहोत, असेही त्यांनी सांगितले.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
लस रवाना
कडेकोट सुरक्षा बंदोबस्तामध्ये सीरम इन्स्टिट्यूटमधून आज देशातील तेरा ठिकाणांवर कोरोनाची लस रवाना झाली. यामध्ये दिल्ली, कर्नाल, अहमदाबाद, चंडीगड, लखनौ, चेन्नई, बंगळूर, हैदराबाद, विजयवाडा, भुवनेश्वर, कोलकता आणि गुवाहाटी या शहरांचा समावेश आहे. पुण्यातील मदत साहाय्य पुरविणारी कंपनी कूल-एक्स कोल्ड चेनने या लशीच्या वाहतुकीचे आव्हान पेलले असून त्यासाठी अत्याधुनिक ट्रकची मदत घेण्यात आली आहे.
Edited By - Prashant Patil