महाराष्ट्र राज्याला लस वितरण करताना केंद्र सरकारने घेतला आखडता हात

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 13 January 2021

कोरोनाचा देशातील सर्वाधिक उद्रेक महाराष्ट्रात होऊनही राज्याला लस वितरण करताना केंद्र सरकारने आखडता हात घेतला आहे. राज्याला १५ लाख ७२ हजार डोस मिळणे अपेक्षित होते. तशी तयारीही राज्य सरकारने युद्धपातळीवर केली होती. प्रत्यक्षात मात्र केंद्राने ९ लाख ९३ हजार डोसच राज्याला दिले आहेत. त्यामुळे दोन लाख ९४ हजार ५०० कोरोनायोद्‌ध्यांना सध्यातरी लशीची वाट पाहावी लागणार आहे.

पुणे - कोरोनाचा देशातील सर्वाधिक उद्रेक महाराष्ट्रात होऊनही राज्याला लस वितरण करताना केंद्र सरकारने आखडता हात घेतला आहे. राज्याला १५ लाख ७२ हजार डोस मिळणे अपेक्षित होते. तशी तयारीही राज्य सरकारने युद्धपातळीवर केली होती. प्रत्यक्षात मात्र केंद्राने ९ लाख ९३ हजार डोसच राज्याला दिले आहेत. त्यामुळे दोन लाख ९४ हजार ५०० कोरोनायोद्‌ध्यांना सध्यातरी लशीची वाट पाहावी लागणार आहे.

नामांतराच्या विषयावर आता काँग्रेस गप्प; पत्रकारांचा प्रश्नच टाळला

पहिल्या टप्प्यात राज्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांना ही लस उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी राज्यभरातून ७ लाख ८६ हजार आरोग्य कर्मचाऱ्यांनी लशीसाठी नोंदणी केली आहे. त्यात सरकारी आणि खासगी रुग्णालयांमधील डॉक्‍टरांपासून ते आरोग्य कर्मचाऱ्यांपर्यंतच्या सर्वांचा समावेश आहे. या प्रत्येकासाठी लशीचे दोन डोस आहेत. पहिला डोस दिल्यानंतर चार आठवड्यांनी दुसरा डोस देण्यात येणार आहे. एका आरोग्य कर्मचाऱ्याला दोन डोस या प्रमाणे १५ लाख ७२ हजार लसींचे डोस मिळणे अपेक्षित होते.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

प्रत्यक्षात मात्र, त्यापेक्षा ५ लाख ८९ हजार डोस केंद्राकडून कमी मिळाले आहेत. त्यामुळे २ लाख ९४ हजार ५०० कोरोनायोद्‌ध्यांना या वेळी लसीसाठी प्रतीक्षा करावी लागेल.

पुण्यातील ‘सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’कडून केंद्र सरकारने कोव्हिशिल्डच्या एक कोटी १० लाख लस देशासाठी खरेदी केल्या. त्यापैकी ९ लाख ६३ हजार सीरमच्या आणि २० हजार भारत बायोटेकच्या कोव्हॅक्‍सिनच्या अशा मिळून राज्याला ९ लाख ८३ हजार डोस उपलब्ध करून दिले आहेत.

Bird Flu: महाराष्ट्रात थैमान; दोन जिल्ह्यातील साडेसहा हजार कोंबड्या नष्ट करण्याचे आदेश

कोरोनाची सर्वाधिक रुग्णसंख्या महाराष्ट्रात होती. पुणे, मुंबई ही महानगरे हॉटस्पॉट ठरली होती. मात्र, त्यामुळे सर्वाधिक रुग्णसंख्या आढळळेल्या या राज्यातील सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना दोन डोस पुरेल या प्रमाणात लस देणे अपेक्षित होते. मात्र, प्रत्यक्षात तसे झाले नाही, याची खंत सार्वजनिक आरोग्य विभागातील तज्ज्ञांनी व्यक्त केली. 

वकिलांसह पक्षकारही हाजीरऽऽ

पहिल्या दिवशी ३५८ केंद्रे
राज्य सरकारने लसीकरणासाठी ५११ केंद्रे उभारली आहेत. त्यापैकी लसीकरणाच्या पहिल्या दिवशी ३५८ केंद्रे सक्रिय करण्यात येणार आहेत. त्यानंतर टप्प्या-टप्प्याने पुढील केंद्रे सुरू करण्याची शक्‍यता आरोग्य खात्यातील अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.  

  • १ कोटी १० लाख - केंद्राने सीरमकडून खरेदी केलेले कोव्हिशिल्ड लशीचे डोस
  • ९ लाख ६३ हजार - राज्याला वितरित केलेले कोव्हिशिल्ड लशीचे डोस
  • २० हजार - भारत बायोटेकच्या कोव्हॅक्‍सिन लशीचे डोस
  • ७ लाख ८६ हजार - राज्यात लशीसाठी नोंदणी झालेले आरोग्य कर्मचारी
  • १५ लाख ७२ हजार - प्रत्येक आरोग्य कर्मचाऱ्याला दोन याप्रमाणे लशीच्या डोसची प्रत्यक्ष गरज
  • ५ लाख ८९ हजार - कमी पडणारे डोस
  • २ लाख ९४ हजार ५०० - लशीपासून वंचित राहणारे आरोग्य कर्मचारी

‘राज्याला मागणीच्या ५५ टक्के लस मिळाली आहे. त्यामुळे लसीकरण केंद्राची फेररचना करण्याची प्रक्रिया सुरू आहे. प्रत्येक आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी दोन डोस राखीव ठेवण्यात येतील. भारत बायोटेकची लस मोठ्या शहरांमधील अद्ययावत रुग्णालयांमध्ये देण्यात येईल,’
- डॉ. अर्चना पाटील, संचालक, सार्वजनिक आरोग्य खाते.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: distributing vaccine maharashtra state central government