पुणे - अभियांत्रिकी परीक्षेतील शैक्षणिक प्रामाणिकतेला काळिमा फासणारा प्रकार वाघोलीत उघडकीस आला आहे. एका खासगी अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्राध्यापकाने विद्यार्थ्यांकडून पैसे घेऊन रात्री बीजगणित विषयाच्या प्रश्नपत्रिका सोडवून घेतल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी संबंधित प्राध्यापकासह तिघा विद्यार्थ्यांना अटक करण्यात आली आहे.