पुणे विद्यापीठाच्या प्रश्न पत्रिकाच वेटिंगवर; सेमिस्टर परीक्षा होणार कशा?

professors question sets Pune university 2021-2022 First Semester Exam
professors question sets Pune university 2021-2022 First Semester Exam

पुणे : एकीकडे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षेच्या तारखा आणि निविदेचा घोळ संपत नाही, दुसरीकडे आता परिक्षेसाठी प्रश्‍नसंच तयार करण्याच्या कामाकडे पॅनेलवरील प्राध्यापक टाळाटाळ करत असल्याने काम संथपणे सुरू असल्याचे समोर आले आहे. प्राध्यापकांनी त्यांना दिलेली जबाबदारी पार पाडली नाही तर कारवाई केली जाईल अशी तंबी दिली आहे. पुणे विद्यापीठाने शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मधील प्रथम सत्राच्या परीक्षा घेण्याचे जाहीर केले आहे. या परीक्षा १५ ते २० मार्चपासून टप्याटप्प्याने सुरू होतील असा निर्णय ९ फेब्रुवारीच्या परीक्षा मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. पण अद्याप त्याबाबतचे परिपत्रक जाहीर करण्यात आलेले नाही. प्रथम सत्र परीक्षेमध्ये सर्व विद्याशाखेचे मिळून सुमारे ६ हजार १०० विषय असून, त्यासाठी साडे सहा लाख विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.

अंतिम वर्षाच्या परीक्षेसाठी बहुपर्यायी प्रश्‍न(Multiple Choice Questions- MSQ) काढण्यात आले होते. पण त्यामध्ये प्रश्‍न तयार करताना अनेक चुका झाल्याने परीक्षेमध्ये मोठ्याप्रमाणात गोंधळ झाला होता. त्यानंतर विद्यापीठाने बॅकलॉग परीक्षेपूर्वी प्राध्यापकांना प्रश्‍न कसे काढावेत याचे प्रशिक्षण दिल्याने गोंधळ टळला. प्रथम सत्र परीक्षेसाठी विषयांची संख्या व विद्यार्थी संख्या दुप्पटीपेक्षा जात आहे. विद्यापीठाने त्यामुळे हे काम पूर्वीपेक्षा काळजीपूर्वक करावे लागणार आहे. मात्र, ज्या प्राध्यापकांची नियुक्ती या कामासाठी करण्यात आली आहे, त्यांच्याकडून प्रश्‍नसंच तयार करण्यास टाळाटाळ केली जात आहे. अभ्यास मंडळाच्या अध्यक्षांकडून पाठपुरावा केला जात असला तरी त्यास व्यवस्थित उत्तर मिळत नाही. हे काम पूर्ण करण्यास अजून किमान १० ते १२ दिवस लागतील असे काही अभ्यास मंडळांच्या अध्यक्षांशी चर्चा केल्यानंतर समोर आले आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

याबाबत तक्रारी आल्याने परीक्षा मंडळ व मूल्यांकन विभागाने याबाबत एक पत्र काढून जे प्राध्यापक जबाबदारी पार पाडण्यास टाळाटाळ करत आहेत. त्यांच्याबद्दल लेखी तक्रार करणारा इमेल परीक्षा समन्वय कक्षाकडे पाठवावा. त्यानुसार संबंधितांवर विद्यापीठ अधिनियम ४८(४)नुसार कारवाई करण्यात येईल असे स्पष्ट केले आहे.


‘‘अभ्यास मंडळानी ज्या प्राध्यापकांची नियुक्ती केली आहे त्यांना प्रश्‍न काढावे लागतील. टाळाटाळ करणाऱ्या प्राध्यापकांवर कारवाईचा प्रस्ताव परीक्षा प्रमाण मंडळापुढे सादर केला जाईल.’’
डॉ. महेश काकडे, संचालक

रास्ता पेठेत इमारतीला भीषण आग; 3 फ्लॅट्स व 2 दुकानं भस्मसात 
टाळाटाळ करताना ही कारणे दिली जातात
- महाविद्यालयातील कामाचा ताण आहे
- तब्येत बरी नाही
- जवळचे नातेवाईक वारले आहेत
- एकाच प्राध्यपकाची ५ पेक्षा जास्त पेपरसाठी नियुक्ती केल्याने वेळ न मिळणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com