Shirur Crime : जागेचा वाद विकोपाला! भाडोत्री शुटर्सनी जागा मालकाऐवजी त्याच्या कामगारालाच घातल्या गोळ्या, कामगाराचा घटनास्थळीच मृत्यु

दोन तालेवार घराण्यातील जागेचा वाद विकोपाला गेल्यानंतर, एकाला संपविण्यासाठी सराईत अशा शार्प शुटर गॅंगकडे संबंधिताला गोळ्या घालून ठार मारण्याची सुपारी देण्यात आली.
Shirur Crime

Shirur Crime

sakal

Updated on: 

शिरूर - कारेगाव (ता. शिरूर) येथील दोन तालेवार घराण्यातील जागेचा वाद विकोपाला गेल्यानंतर, एकाला संपविण्यासाठी सराईत अशा शार्प शुटर गॅंगकडे संबंधिताला गोळ्या घालून ठार मारण्याची सुपारी देण्यात आली. मात्र, भाडोत्री शुटर्सनी जुजबी माहितीच्या आधारे जागा मालकाऐवजी त्याच्या कामगारालाच गोळ्या घातल्या. दोन बड्या घराण्यातील जागेचा वाद निरपराध कामगाराच्या जीवावर बेतल्याचे पोलिस तपासातून निष्पन्न झाले आहे. खूनाची सुपारी देणाऱ्यासह गोळीबाराचा कट रचणाऱ्या पाचजणांना अटक करण्यात पोलिसांना यश आले असले; तरी प्रत्यक्ष घटनास्थळावर गोळीबार करणारे दोघेजण मात्र अद्याप फरारच आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com