पुणे - पुणे महापालिकेची निवडणूक अवघ्या दोन-तीन महिन्यांवर येऊन ठेपलेली असताना महापालिका प्रशासनाने मिळकतकराच्या थकबाकीदारांसाठी अभय योजना राबवून ‘बक्षीस’ देण्याची तयारी सुरू केली आहे..अभय योजना मंजूर करण्यासाठीचा प्रस्ताव महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्याकडे पाठविण्यात आला आहे. प्रामाणिक करदात्यांना सवलत न देता दंडाची भिती दाखवली जाते, पण थकबाकीदारांचा दंड माफ करून महापालिकेचे कोट्यावधी रुपयांचे उत्पन्न बुडवले जात असल्याचे हे यातून समोर येत आहे.पुणे महापालिकेचे उत्पन्न वाढविण्याची सर्वाधिक जास्त जबाबदारी ही मिळकतकर विभागावर आहे. त्यामुळे थकबाकीदारांकडून रक्कम वसूल करण्यासाठी मिळकती जप्त करणे, टाळे ठोकणे, त्यांचा लिलाव करणे अशा उपाययोजना महापालिका राबवत असते..पण त्यातून वर्षाला १००-२०० कोटी पेक्षा जास्त रक्कम जमा होत नाही. मिळकतकराची एकूण थकबाकी सुमारे १३ हजार कोटी रुपये आहे, यातील न्यायालयीन प्रकरणांमध्ये सुमारे ३ हजार कोटी रुपयांची थकबाकी आहे. पण उर्वरित जागा मालक थकबाकी भरण्याकडे दुर्लक्ष करत आहेत.दुसरीकडे महापालिका प्रामाणिक करदात्यांना कोणतीही सवलत देत नाही. त्यांना कर भरण्यास उशीर केला तर लगेच दोन टक्के शास्ती लावली जाते. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक लगेच पैसे भरून टाकतो. प्रामाणिक करदात्यांना कोणताही फायदा मिळत नाही, उलट त्यांच्यासाठी राबविण्यात आलेली बक्षीस योजना एका वर्षात गुंडाळण्यात आली आहे. पण निवडणुकीच्या तोंडावर थकबाकीदारांना दिलासा देण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून केला जात आहे..थकबाकीदार पुन्हा पुन्हा तेच थकबाकीदारअभय योजनेचा फायदा हा निवसीपेक्षा व्यावसायिक मिळतकधारकांना होणार आहे. दंडावर मोठ्या प्रमाणात सूट देखील दिली जाणार असल्याने व्यावसायिक मिळकत धारकांचा मोठा फायदा होणार आहे.दरम्यान यापूर्वी २०२०-२१ आणि २०२१-२२ मध्ये महापालिकेने अशीच अभय योजना राबविली होती. त्यावेळी काही काळ महसूल वाढला असला तरी यात सुमारे २४ हजार मिळकतधारकांनी या दोन्ही अभय योजनेचा फायदा घेतला आहे..मिळकतकराची रक्कम महापालिकेकडे न भरता ती इतरत्र गुंतवून त्यातून फायदा कमावला जात आहे. त्यानंतर राजकीय दबाव वापरून अभय योजना आणण्यास भाग पाडले जाते. त्यामुळे जास्त दंड भरावा लागत नाही. अभय योजनेचा यापूर्वी ज्यांना लाभ घेतला आहे त्यांना आता पुन्हा २०२५ च्या योजनेचा लाभ मिळणार नाही असा नियम करणार का? याकडे लक्ष लागले आहे‘मिसिंग लिंकचे रस्ते करण्यासह अन्य मोठे प्रकल्पांचे काम करण्यासाठी निधीची आवश्यकता आहे, त्यामुळे अभय योजना राबविण्यासाठी प्रशासन विचाराधीन आहे. या अभय योजनेत यापूर्वी ज्यांनी लाभ घेतला आहे, त्यातील किती जण पुन्हा थकबाकीदार झाले आहेत याची माहिती घेऊन त्याबाबत योग्य निर्णय घेतला जाईल.’- नवल किशोर राम, आयुक्त, महापालिका.अशी आहे स्थितीमिळकतकराची एकूण थकबाकी : १३,००० कोटी रुपयेथकबाकीदार मिळकतधारक : सुमारे ५.५ लाखथकबाकी आकारला जाणारा दंड : दरवर्षी २४ टक्केयापूर्वीच्या अभय योजनेतून मिळालेले उत्पन्न : ६३० कोटी रुपयेमाफ केलेले व्याज : २७५ कोटी रुपयेलाभ घेणारे मिळकतधारक : २.१० लाखपुन्हा थकबाकीदार झालेल्यांची संख्या : २४ हजारपुन्हा थकविलेला कर : २२१ कोटी रुपये.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.