पिंपरी चिंचवडकरांसाठी खूशखबर; मिळकतकरांविषयी महापालिकेचा मोठा निर्णय

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 13 जानेवारी 2020

  • शहरातील दीड लाख मिळकतींना फायदा
  • पाचशे चौरस फुटांपर्यंत मिळकतकर माफ 

पिंपरी : शहरातील 500 चौरस फुटांपर्यंतच्या निवासी मिळकतींना पुढील आर्थिक वर्षापासून मिळकतकर न आकारण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्याबाबतचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविण्यात येणार आहे. या निर्णयाचा एक लाख 51 हजार 420 मिळकतधारकांना फायदा होईल, अशी माहिती महापौर उषा ढोरे यांनी दिली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

शहरात पाच लाख 22 हजार 630 मिळकती आहेत. त्यात निवासी व व्यावसायिक मिळकतींचाही समावेश आहे. त्यांच्याकडून आकारला जाणारा वार्षिक कराचा दर महापालिकेने निश्‍चित केलेला आहे.

भाजपची सत्ता असलेल्या या राज्यात तान्हाजी टॅक्स फ्री? महाराष्ट्रात कधी?

2019-20 या आर्थिक वर्षात मिळकतकरापोटी 28 कोटी 76 लाख 88 हजार 294 रुपये उत्पन्न पालिकेला अपेक्षित आहे. मात्र, सामान्य नागरिकांची करातून मुक्तता करण्यासाठी 500 चौरस फुटांपर्यंतच्या निवासी मिळकतींना 2020-21 या आर्थिक वर्षांपासून मिळकतकर न आकारण्याचा निर्णय सर्वसाधारण सभेने घेतला आहे. त्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडे अंतिम मान्यतेसाठी लवकरच पाठविण्यात येणार आहे. मान्यता मिळविण्यासाठी प्रशासकीय आणि राजकीय पातळीवर पाठपुरावा करण्यात येईल, असेही त्या म्हणाल्या.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Property tax free up to five hundred square feet in PCMC area says mayor dhore