भाजपची सत्ता असलेल्या 'या' राज्यात 'तान्हाजी' टॅक्स फ्री? महाराष्ट्रात कधी?

वृत्तसेवा
Monday, 13 January 2020

भारतीय जनता पक्षाची सत्ता असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये योगी सरकारने तान्हाजी चित्रपट टॅक्स फ्री केला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सरदारांमधील शूरवीर तानाजी मालुसरेंच्या कोंढाणा किल्ल्याची शौर्यगाथा तानाजी चित्रपटाच्या माध्यमातून मोठ्या पडद्यावर आली आहे.

मुंबई - भारतीय जनता पक्षाची सत्ता असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये योगी सरकारने तान्हाजी चित्रपट टॅक्स फ्री केला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सरदारांमधील शूरवीर तानाजी मालुसरेंच्या कोंढाणा किल्ल्याची शौर्यगाथा तानाजी चित्रपटाच्या माध्यमातून मोठ्या पडद्यावर आली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कोंढाणा किल्ला जिंकताना धारातीर्थी पडलेल्या तानाजी यांच्याबद्दल छत्रपती शिवाजी महाराजांनी गड आला पण सिंह गेला असे म्हटले होते. त्यानंतर, कोंढाणा या किल्ल्यास सिंहगड असे नाव देण्यात आले. ही सर्व कथा मोठ्या पडद्यावर मांडण्यात आली आहे. महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्याच्या भूमीत तानाजी मालुसरेंनी हा पराक्रम गाजवला होता. म्हणून, अजय देवगणची भूमिका असलेला तानाजी चित्रपट महाराष्ट्रात टॅक्स फ्री करा, अशी मागणी होत असताना हा चित्रपट अजूनही महाराष्ट्रात टॅक्स फ्री करण्यात आलेला नाही.

मोदींची तुलना शिवाजी महाराजांशी करणारे जय भगवान गोयल आहेत कोण?

उत्तर प्रदेशातील योगी सरकारने मात्र, उत्तर प्रदेशमध्ये तान्हाजी चित्रपट करमुक्त केला आहे. राज्य सरकारच्या आज झालेल्या कॅबिनट बैठकीत हा चित्रपट टॅक्स फ्री करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्रात मात्र यावर कुठलाही निर्णय झाला नसल्याने छत्रपतींच्या महाराष्ट्रात हा चित्रपट कधी करमुक्त होणार अशी चर्चा सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. तत्पूर्वी, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनीही महसूलमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्याकडे तान्हाजी चित्रपट टॅक्स फ्री करण्याची मागणी केली आहे. गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यासह महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनीही ही मागणी केली आहे.

उद्धवजी, राऊताच्या जिभेला लगाम घाला; संभाजीराजे आणि राऊत यांच्यात ट्विटरयुद्ध

दरम्यान, अजय देवगन, सैफ अली खान आणि काजोल अभिनीत हा तान्हाजी हा सिनेमा असून दीपिका पादुकोण अभिनीत छपाक हा सिनेमा सध्या थिएटरमध्ये झळकत आहे. दोन्ही सिनेमांनी आतापर्यंत चांगली कमाई केली असली तरी यात तान्हाजीने कमाईच्या बाबतीत छपाकला मागे टाकले आहे. तान्हाजी चित्रपटाने तीन दिवसात 61.75 कोटींची कमाई केली आहे. तर, छपाकने बॉक्स ऑफिसवर केवळ 19.02 कोटी रुपये कमावले आहेत. तान्हाजी आणि छपाक चित्रपटावरुन देशात चांगलेच राजकारण तापले आहे. काँग्रेससह डाव्या पक्षांकडून छपाकला समर्थन देण्यात येत आहे, तर भाजपाकडून तान्हाजी चित्रपटाला पाठिंबा मिळत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tanhaji The Unsung Warrior to be made tax-free in Uttar Pradesh