पुणे - पुणे महापालिकेत समाविष्ट झालेल्या ३२ गावांच्या मिळकतकराच्या प्रश्नावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंबईत बैठक घेऊन दोन दिवसात यावर निर्णय घेतला जाईल असे स्पष्ट केले होते.
मात्र, आज यासंदर्भात नगरविकास विभागाने काढलेल्या आदेशात या गावांना ग्रामपंचायतीच्या मिळकतकरापेक्षा जास्त कर आकारू नये या आदेशाची ऑक्टोबर २०२४ मध्ये काढलेल्या आदेशाचीच अंमलबजावणी करावी. तो पर्यंत कर आकारणी करू नये आदेश दिले आहेत. त्यामुळे उपमुख्यमंत्र्यांकडे झालेल्या बैठकीनंतरही या प्रश्नाचे घोंगडे भिजत राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.