15 फेब्रुवारीपर्यंत विद्यार्थ्यांसाठी जात पडताळणीचे प्रस्ताव

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 31 जानेवारी 2020

पुणे : इयत्ता बारावी विज्ञान शाखेमध्ये आरक्षणांतर्गत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी जात पडताळणीसाठी 15 फेब्रुवारीपर्यंत प्रस्ताव पाठवावेत, असे आवाहन जिल्हा जात पडताळणी समितीचे उपायुक्‍त नितीन ढगे यांनी केले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

ज्या विद्यार्थ्यांचे जात प्रमाणपत्र आणि आवश्‍यक पुरावे पुणे जिल्ह्यातील आहेत, अशा विद्यार्थ्यांनी पुणे जिल्हा जात पडताळणी समितीकडे अर्ज सादर करावेत. तसेच, पुणे जिल्ह्यातील महाविद्यालयांनी आपापल्या स्तरावरून 12 वी विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांना अर्ज सादर करण्याबाबत सूचना द्याव्यात.

कोरोनाला घाबरू नका; अशा प्रकारे घ्या काळजी

शासन स्तरावर अनेक अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यापूर्वी जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे आवश्‍यक आहे. त्यामुळे 12 वी विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांनी 15 फेब्रुवारीपर्यंत अर्ज समितीकडे सादर करावेत. विद्यार्थ्यांनी आपले अर्ज barti.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर भरावेत. अधिक माहितीसाठी हेल्पलाइन क्रमांक 18002330444

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Proposal for caste verification for students till 15th February

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: