Pune Municipal Corporation : सीबीएसई शाळांबाबत मौन; महापालिकेकडे प्रस्ताव धूळखात,पालक-पाल्यांना प्रतीक्षा

मुंबईपाठोपाठ पुण्यातील महापालिकेची केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाची शाळा सुरू करण्याचा चर्चेत आलेला प्रस्ताव आता धूळखात पडला आहे. महापालिका आयुक्तांची बदली आणि लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे महापालिकेच्या सीबीएसई शाळेच्या चर्चेवर शिक्षणाधिकाऱ्यांचे मौन कायम आहे.
Pune Municipal Corporation
Pune Municipal Corporationsakal

पुणे : मुंबईपाठोपाठ पुण्यातील महापालिकेची केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाची शाळा सुरू करण्याचा चर्चेत आलेला प्रस्ताव आता धूळखात पडला आहे. महापालिका आयुक्तांची बदली आणि लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे महापालिकेच्या सीबीएसई शाळेच्या चर्चेवर शिक्षणाधिकाऱ्यांचे मौन कायम आहे. त्यामुळे विद्येच्या माहेरघरात महापालिकेच्या सीबीएसई शाळेसाठी आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे.

मराठी माध्यमाच्या शाळांमधील दिवसेंदिवस घटणारी विद्यार्थ्यांची पटसंख्या, त्या तुलनेत इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी असणारा पालकांचा ओढा, या धर्तीवर पुणे महापालिकेने सीबीएसई शाळा सुरू करावी, असा विचार मांडण्यात आला. याबाबत काही महिन्यांपूर्वी तत्कालीन महापालिका आयुक्तांनी शिक्षणाधिकाऱ्यांशी चर्चाही केली.

महापालिकेअंतर्गत शाळेसाठी आरक्षित जागेत भवन रचना विभागातर्फे नव्याने शाळा बांधल्या आहेत. नव्याने बांधलेल्या शाळांचे बांधकाम पूर्ण झाले असून अद्याप सुरू झालेल्या नाहीत, अशी स्थिती आहे.

Pune Municipal Corporation
Pune Loksabha : धंगेकरांच्या प्रचाराची शक्तिप्रदर्शनाने सांगता ; जनतेने निवडणूक हाती घेतल्यामुळे विजय निश्‍चित ,धंगेकर

सध्या बहुतांश पालकांचा कल पाल्यांना मराठी माध्यमाऐवजी इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये टाकण्याचा आहे. त्यामुळे महापालिकेने नव्याने बांधून तयार असणाऱ्या आणि अद्याप सुरू न झालेल्या शाळा पारंपरिक पद्धतीने मराठी माध्यमाच्या सुरू केल्यास त्याला कितपत प्रतिसाद मिळेल, याची खात्री देता येत नाही.

म्हणून महापालिकेने नव्या शाळा खासगी संस्थांच्या मदतीने सीबीएसईच्या सुरू कराव्यात, अशी मागणी माजी नगरसेवकांनी केली होती. त्यासंदर्भात महापालिकेकडे प्रस्तावही दिला होता. परंतु सीबीएसई शाळा सुरू करण्याच्या चर्चा थांबल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी नाव न घेण्याच्या अटीवर दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com