ऑनलाईन माध्यमाद्वारे सुरू असलेला वेश्‍याव्यवसायाचा पोलिसांकडून पर्दाफाश   

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 24 October 2020

पोलिसांनी तेथे छापा घातल्यानंतर त्यांना तेथे एक तरुणी आढळली. तिच्याकडे चौकशी केल्यानंतर संबंधित तरुणी सिक्कीमची असल्याचे समजले. त्यानंतर पोलिसांनी वाकड येथे संबंधित तरुणींकडून वेश्‍या व्यवसाय करून घेणाऱ्याच्या घरी छापा घातला.

पुणे- शहरात ऑनलाइन सुरू असलेल्या वेश्‍या व्यवसायाचा गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने पर्दाफाश केला. या कारवाईमध्ये पोलिसांनी दोन तरुणींची सुटका केली. तर त्यांना वेश्‍याव्यवसाय करण्यास भाग पाडणाऱ्या चौघांना अटक केली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पवित्रकुमार नागेश्वर महतो, दिलीपकुमार परमेश्वर महतो, सचिनकुमार वासुदेव मंडल, अनिलकुमार मेकलाल मंडल (सर्व रा. वाकड, मूळ रा. झारखंड) असे अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे असल्याची माहिती पोलिस उपायुक्त बच्चन सिंग यांनी दिली. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

इंटरनेटवरील "व्हिवास्ट्रीट' या वेबसाइटच्या माध्यमातून ऑनलाइन वेश्‍याव्यवसाय केला जात असल्याची खबर सामाजिक सुरक्षा विभागाचे पोलिस उपनिरीक्षक श्रीधर खडके व पोलिस हवालदार संतोष भांडवलकर यांना माहिती मिळाली होती. त्यानुसार त्यांनी संबंधित वेबसाइटवर एस्कॉर्ट सेवा देण्यासाठी उपलब्ध करून दिलेल्या मोबाईल क्रमांकावर बनावट ग्राहकाद्वारे संपर्क साधला. त्यावेळी त्यांना रामवाडी येथील एका हॉटेलमध्ये तरुणी पाठविण्यात आल्याची माहिती देण्यात आली. पोलिसांनी तेथे छापा घातल्यानंतर त्यांना तेथे एक तरुणी आढळली. तिच्याकडे चौकशी केल्यानंतर संबंधित तरुणी सिक्कीमची असल्याचे समजले. त्यानंतर पोलिसांनी वाकड येथे संबंधित तरुणींकडून वेश्‍या व्यवसाय करून घेणाऱ्याच्या घरी छापा घातला. तेथून चौघांना अटक करण्यात आली. 

महाराष्ट्रातील बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Prostitution through online media police arrested four person