esakal | पुणे: शिवाजीनगरात उत्तर प्रदेशातील घटनेचा तीव्र निषेध । Pune
sakal

बोलून बातमी शोधा

पुणे: शिवाजीनगरात उत्तर प्रदेशातील घटनेचा तीव्र निषेध

पुणे: शिवाजीनगरात उत्तर प्रदेशातील घटनेचा तीव्र निषेध

sakal_logo
By
समाधान काटे

शिवाजीनगर : उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी जिल्ह्यात केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या मुलाच्या कारखाली दोन शेतकरी चिरडून मरण पावण्याची घटना रविवारी घडली. या नंतर झालेल्या हिंसाचारात ९ जण ठार तर शेकडो जखमी झाले. या घटनेचा निषेध म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस, कॉंग्रेस पक्षाच्या वतीने स्व.वसंतराव नाईक यांच्या पुतळ्यासमोर , कृषी महाविद्यालय चौक, शिवाजीनगर येथे आंदोलन करण्यात आले.

हेही वाचा: इंदापूर: गुलाब पुष्प व मास्क देऊन विद्यार्थ्यांचे शाळेत स्वागत

स्व.वसंतराव नाईक यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण शेकडो पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. यावेळी बलिदान व्यर्थ ना जाने देंगे, किसान तेरे हक से लढेंगे. धिक्कार असो धिक्कार असो खुणी भाजपचा धिक्कार असो. चले जाव चले जाव, खुनी भाजपा चले जाव अशा घोषणा देण्यात आल्या. यावेळी माजी न्यायमूर्ती बी.जी. कोळसे- पाटील, कॉंग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस मोहन जोशी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ता प्रदीप देशमुख, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जेष्ठ नेते अजित अभ्यंकर, शेतकरी कृषी बचाव समितीचे निमंत्रक नितीन पवार, डॉ.किशोर खिलारे,अभय छाजेड,कमल व्यवहारे, उदय महाले, महेश हांडे, अनिता पवार आदी उपस्थित होते.

loading image
go to top