रामराजे नाईक निंबाळकरांच्या प्रतिकात्मक पुतळा दहनाच्या निषेधार्थ साखरवाडीत मोर्चा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

pune.jpg

फलटण : सातारा येथे काल दुपारी राजे प्रतिष्ठान व खासदार उदयनराजे भोसले यांच्या समर्थकांनी विधान परिषद सभापती व फलटण तालुक्याचे सर्वेसर्वा रामराजे नाईक निंबाळकर यांचा प्रतिकात्मक पुतळ्याचे केलेल्या दहनाच्या निषेधार्थ तालुक्यातील गावोगावी सदर घटनेचा निषेध रामराजे यांच्या कार्यकर्त्यांकडून सुरु आहे.

रामराजे नाईक निंबाळकरांच्या प्रतिकात्मक पुतळा दहनाच्या निषेधार्थ साखरवाडीत मोर्चा

sakal_logo
By
किरण चव्हाण

फलटण : सातारा येथे काल दुपारी राजे प्रतिष्ठान व खासदार उदयनराजे भोसले यांच्या समर्थकांनी विधान परिषद सभापती व फलटण तालुक्याचे सर्वेसर्वा रामराजे नाईक निंबाळकर यांचा प्रतिकात्मक पुतळ्याचे केलेल्या दहनाच्या निषेधार्थ तालुक्यातील गावोगावी सदर घटनेचा निषेध रामराजे यांच्या कार्यकर्त्यांकडून सुरु आहे.

आज सकाळी ११ वाजता तरडगाव येथे पुणे ते पंढरपूर मार्गावर सुमारे अर्धा तास रास्ता रोको आंदोलन करुन निषेध नोंदविला व त्यानंतर ग्रामपंचायत कार्यालयाच्या प्रांगणात निषेधाची सभा पंचायत समिती माजी सभापती वसंतराव गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली झाली.

साखरवाडी गावात काल सायंकाळी माजी सभापती शंकरराव माडकर यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामस्थांनी गावातून सदर घटनेचा निषेध मोर्चा काढून केला. तसेच राजाळे व राजूरी गावातही राजे गटाच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन निषेध मोर्चे काढले. 

loading image
go to top