Protest Erupts Over Water Shortage in Vimanagar vadgaon sheri
sakal
वडगाव शेरी - विमान नगरच्या यमुनानगर येथील अनियमित आणि अपुऱ्या पाणीपुरवठा विरोधात आज नागरिकांच्या संतापाचा उद्रेक झाला. संतप्त नागरिकांनी सरळ पाण्याची टाकी गाठून तेथील मुख्य रस्त्यावर ठिय्या मारला आणि कपडे धुण्याचे आंदोलन केले. नागरिकांनी अचानक आंदोलन पुकारल्यामुळे प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली.