काश्मिरमधील पत्रकाराच्या हत्येचा निषेध

मिलिंद संधान.
रविवार, 17 जून 2018

नवी सांगवी ( पुणे ) : रायझिंग काश्मिरचे संपादक डॉ. शुजात बुखारी यांची अतिरेक्यांनी नुकतीच काश्मिर मध्ये गोळ्या घालून हत्या केली. त्याच्या निषेधार्थ येथील ओम साई फाऊंडेशनच्या वतीने पदयात्रा काढून निषेध करण्यात आला. 

मागिल आठवड्यात श्रीनगर येथील लाल चौकात सीमा सुरक्षा दलाचे जवान व बुखारी यांच्यावर अतिरेक्यांनी चौफेर हल्ला करून त्यांची हत्या केली होती. त्याचा निषेध म्हणून फाऊंडेशनचे अध्यक्ष संजय मराठे व त्यांच्या सहकाऱ्यांनी कवडेनगर ते विनायकनगर पदयात्रा निषेध व्यक्त केला. यावेळी दत्तात्रेय भोसले, पंकज सारसर, अमित कानडे, राहुल कचरे, शानूर सय्यद, प्रसाद जंगम, हरिनारायण डोबाळे, पप्पू इंगोळे, निलेश मातणे, गणेश राठोड, विरेन जाधव, भरत गमे, तौफिक सय्यद, विघ्नेश डोंबाळे, किरण चव्हाण यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. 

Web Title: The protest of the murder of the journalist in Kashmir.