देवीच्या मंदिरात महिला पुजारीची मागणी; तृप्ती देसाईंच्या फोटोला जोडे मारो आंदोलन

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 28 January 2021

''माहूरचे रेणुका मंदीर हे साडेतीन पीठांपैकी एक पूर्णपीठ असलेले जागृत देवस्थान आहे. मात्र या मंदीराच्या विश्वस्तात आणि पुजाऱ्यांमध्ये एकही महिला नाही. मातेला अंघोळ, कपडे, मंगळसुत्र हे पुरुष पुजारीच करतात हा तमाम महिला वर्गाचा अपमान आहे.

पुणे :  भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी  राज्यातील देवीच्या मंदिरात महिला पुजारी असावी अशी मागणी केली आहे. या मागणीला ब्राम्हण महासंघ महिला आघाडीने विरोध केला आहे. या विरोधात पुण्यातील सारसबागेसमोरील महालक्ष्मी मंदिरासमोर ब्राम्हण महासंघ महिला आघाडीने निषेध आंदोलन केले. यावेळी भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाईंच्या फोटोला जोडे मारो आंदोलन करण्यात आले.

''माहूरचे रेणुका मंदीर हे साडेतीन पीठांपैकी एक पूर्णपीठ असलेले जागृत देवस्थान आहे. मात्र या मंदीराच्या विश्वस्तात आणि पुजाऱ्यांमध्ये एकही महिला नाही. मातेला अंघोळ, कपडे, मंगळसुत्र हे पुरुष पुजारीच करतात हा तमाम महिला वर्गाचा अपमान आहे. यासाठी विश्वस्तात व पुजाऱ्यांमध्ये पन्नास टक्के महिला घेण्यात याव्यात 'अशी मागणी विश्वस्तांकडे करण्यात आली आहे. यासाठी लवकरच आंदोलन उभे करणार असल्याचे भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
 

दरम्यान तृप्ती देसाईंच्या या मागणीला ब्राम्हण महासंघ महिला आघाडीने विरोध केला. यावेळी तृप्ती देसाईंच्या फोटोला काळे फासून आणि जोड्याने बडवून निषेध आंदोलन करण्यात आले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: protest to the photo of Trupti Desai demanding a female priest in the temple of Goddess