शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेत्या खेळाडूंचे उपोषण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेत्या खेळाडूंचे उपोषण

शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेत्या खेळाडूंचे उपोषण

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

औंध : राज्य सरकारच्या शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेत्या खेळाडूंची शैक्षणिक पात्रतेनुसार सरकारी किंवा निमसरकारी कार्यालयात थेट नियुक्ती करण्यात यावी यासंदर्भात पात्र खेळाडूंनी महाळुंगे-बालेवाडी येथील क्रीडासंकुलात अमरण उपोषण सुरु केले आहे. विकास काळे, सागर गुल्हाने,नेहा ढेपे, लौकिक फुलकर ही उपोषणाला बसलेल्या खेळाडूंची नावे असून यांच्यासह १०४ पात्र खेळाडू नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत. 

हेही वाचा: कंगना काय चुकीचं बोलली, माझ्याकडे पुरावे : विक्रम गोखले

मागील तीन वर्षांपासून विविध माध्यमातून तसेच प्रत्यक्ष भेटून संबंधितांना निवेदने देऊन देखील केवळ आश्वासनेच दिली गेल्याचे खेळाडूंचे म्हणने आहे. खेळातील उत्कृष्ट कामगिरीसाठी राज्य सरकारने सर्वोच्च असा शिवछत्रपती पुरस्कार प्रदान केलेला आहे. परंतु या पुरस्कार प्राप्त खेळाडूंना उदरनिर्वाह करण्याचा प्रश्न सुटलेला नाही. त्यामुळे आम्हाला सरकारी किंवा निमसरकारी कार्यालयात थेट नियुक्ती मिळायला हवी असे विकास काळे या खेळाडूने सांगितले.

हेही वाचा: "खेळाडू म्हणजे मशिन नाही"; कर्णधार होताच रोहितचं रोखठोक मत

उपोषणास बसलेल्या खेळाडूंपैकी विकास काळे (कबड्डी),सागर गुल्हाने (आट्यापाट्या),नेहा ढेपे ( तलवारबाजी) वलौकीक फुलकर (आट्यापाट्या) या क्रिडा प्रकारातील खेळाडू आहेत. यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, क्रिडा मंत्री सुनील केदार, आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनाही निवेदनाद्वारे कळवले आहे.तरी आमची दखल राज्य सरकारने व प्रशासनाने घेऊन खेळाडूंना न्याय द्यावा अशी भूमिका खेळाडूंनी मांडली आहे.

loading image
go to top