Rohit Sharma Press Conference | IND vs NZ: "खेळाडू म्हणजे मशिन नाही"; कर्णधार होताच रोहित शर्माचं रोखठोक मत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rahul-Dravid-Rohit-Sharma

रोहित शर्मा, राहुल द्रविड यांची संयुक्त पत्रकार परिषद

"खेळाडू म्हणजे मशिन नाही"; कर्णधार होताच रोहितचं रोखठोक मत

sakal_logo
By
विराज भागवत

IND vs NZ : न्यूझीलंडच्या संघाला टी२० विश्वचषक स्पर्धेत उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडला ८ गडी राखून धूळ चारली. या स्पर्धेनंतर आता न्यूझीलंडचा संघ १७ नोव्हेंबरपासून ते ७ डिसेंबरपर्यंत भारत दौऱ्यावर असणार आहे. या कालावधीत भारत-न्यूझीलंड यांच्यात ३ टी२० आणि २ कसोटी सामने खेळले जाणार आहेत. या मालिकेआधी भारताचे नवनिर्वाचित कोच राहुल द्रविड आणि कर्णधार रोहित शर्मा यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. त्यात रोहितने रोखठोक मत मांडलं.

हेही वाचा: IND vs NZ : टी-२० मधून केन विल्यमसनची माघार

टी२० विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाची कामगिरी फारशी चांगली नव्हती. या स्पर्धेनंतर विराटने कर्णधारपद सोडलं तर रवी शास्त्री यांनी मुख्य प्रशिक्षकपद सोडलं. त्यानंतर आता उद्यापासून भारत-न्यूझीलंड यांच्यात टी२० मालिकेला सुरूवात होणार आहे. त्याआधी संघाचे नवे प्रशिक्षक राहुल द्रविड आणि नवा कर्णधार रोहित शर्मा यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत संघाची नवी रणनिती कशी असेल? याबद्दल माहिती दिली. या मालिकेत काही खेळाडूंना विश्रांती दिली आहे. त्यामागे नक्की काय भावना आहे, याबद्दलही रोहितने आणि द्रविडने मत व्यक्त केले.

हेही वाचा: IND VS NZ : कसोटी खेळाडूंचे आजपासून मुंबईत सराव

"भारतीय संघ डिसेंबर २०२०पासून सतत क्रिकेट खेळत आहे. टी२०, कसोटी आणि वन डे अशा तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये आम्ही खेळतो आहोत. त्यामुळे या मालिकेसाठी आणि पुढील कसोटी मालिकेसाठी काही खेळाडूंना विश्रांती देण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. खेळाडू म्हणजे मशिन नाहीत. त्यांनाही थकवा येतो. त्यामुळे अशा परिस्थितीत त्यांना चांगली कामगिरी करत राहायची असेल, तर ठराविक अंतराने ब्रेक देणं आवश्यक असतं", असं स्पष्ट मत रोहितने मांडलं.

हेही वाचा: IND vs NZ : तिकिटांचा काळाबाजार; 900 चं तिकीट 1800 ला, तर 1200 चं तिकीट...

याच मुद्द्यावर राहुल द्रविडनेही दुजोरा दिला. "प्रत्येक संघाचे सातत्याने क्रिकेट सामने असतात. अशा वेळी महत्त्वाच्या खेळाडूंना सगळ्या सामन्यात खेळवणं शक्य होत नाही. ठराविक कालावधीनंतर त्यांनी विश्रांती द्यावीच लागते. फक्त टीम इंडियाच अशा प्रकारच्या गोष्टी करत नाही. न्यूझीलंडकडून केन विल्यमसन खेळणार नाहीये अशी माहिती मिळाली आहे. तोदेखील माणूस आहे. त्यामुळे त्याला विश्रांतीची गरज आहे. असे निर्णय प्रत्येक संघाला केव्हा ना केव्हा घ्यावेत लागतात", अशी असं मत द्रविडने व्यक्त केलं.

loading image
go to top