esakal | अतिक्रमण कारवाई विरोधात पथारी व्यवसायिकांचे निदर्शने
sakal

बोलून बातमी शोधा

अतिक्रमण कारवाई विरोधात पथारी व्यवसायिकांचे निदर्शने

अतिक्रमण कारवाई विरोधात पथारी व्यवसायिकांचे निदर्शने

sakal_logo
By
ब्रीजमोहन पाटील

पुणे: कोरोनामुळे पथारी व्यवसायिक अडचणीत सापडले असताना महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून कारवाई केली जात आहे, चुकीच्या पद्धतीने दुकाने सील केले जात असल्याच्या विरोधात पथारी व्यवसायिकांनी महापालिकेपुढे निदर्शने करून प्रशासनाचा निषेध केला.

हेही वाचा: पुणे विमानतळावर प्रवाशांच्या सोबतीला आता मदतनीसही !

पथारी व्यावसायिक पंचायतीतर्फे निदर्शने करण्यात आली. शहरात विविध भागात अतिक्रमणाची कारवाई व पोलिस कारवाई सुरू आहे. कोरोनाच्या महामारीमुळे अर्थचक्र थंडावले आहे. निर्बंध शिथिल झाल्यानंतर शहरातील रस्ता विक्रेते, परवाना धारक, हातगाडीवाले, पथारी, स्टॉलधारक व्यवसाय सावरत असताना अतिक्रमण विभागाकडून सातत्याने कारवाई सुरू आहे.

गणपती, गौरी यासह इतर सण येत असताना यातून पथारी व्यवसायिकांना सावरण्याची संधी मिळत आहे, पण महापालिकेचे धोरणांमुळे पुन्हा अडचणीत येत आहेत. याबाबत शिष्टमंडळाने आयुक्त विक्रम कुमार यांना भेटून कारवाई थांबविण्याची मागणी केली. याबाबत सर्व खाते प्रमुखांसोबत बैठक घेऊन चर्चा करू असे आश्वासन दिले.

तसेच महापौर मुरलीधर मोहोळ यांनीही सध्या कारवाई करू नये, चर्चा करून तोडगा काढू असे आदेश प्रशासनाला दिले. इकबाल आळंद, मोहन चिंचकर, प्रदिप पवार, संगीता चव्हाण, बारिकराव चव्हाण, हरिभाऊ बिरादार, जब्बार शेख, रमेश अडसूळ ,रविंद्र हुले, सुनंदा घाणेकर, निलम अय्यर हजर होते उपस्थित होते.

loading image
go to top