esakal | सिंहगडावर सुविधा उपलब्ध करा : खासदार सुप्रिया सुळे
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

सिंहगडावर सुविधा उपलब्ध करा : खासदार सुप्रिया सुळे

sakal_logo
By
राजेंद्रकृष्ण कापसे : सकाळ वृत्तसेवा

खडकवासला : शिवस्पर्श लाभलेल्या सिंहगडाचा (Sinhagad) पर्यटनाचा दर्जा वाढविण्यासाठी ऐतिहासिक (Historical) वास्तूंचे संवर्धन, पावित्र्य जपत शिवप्रेमी, निसर्गप्रेमी पर्यटकांना (tourists) चांगल्या सुविधा देण्यासाठी नियोजन करण्याच्या सूचना खासदार (MP) सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी वन अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

सिंहगडावरील प्रत्येक वास्तू, मंदिर, स्मारकांचा इतिहास सिंहगडचे अभ्यासक डॉ. नंदकिशोर मते यांच्याकडून खासदार सुळे यांनी जाणून घेतला. त्यावेळी त्या बोलत होत्या. उपवनसंरक्षक राहुल पाटील यांच्याशी ऐतिहासिक वास्तूंचे संवर्धन करून निसर्गप्रेमी, गडप्रेमी, देशविदेशातील पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी विविध उपाययोजना, सुविधा उपलब्ध करण्यासाठी चर्चा केली. सुमारे तीन तास सुळे यांनी गडाची पाहणी करून याबाबत दर महिन्याला बैठक घेऊन सातत्याने पाठपुरावा करणार असल्याचे नमूद केले. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य नवनाथ पारगे, माजी सरपंच विश्वनाथ मुजुमले, राजेंद्र डिंबळे, खुशाल करंजावणे उपस्थित होते.

नंदकिशोर मते म्हणाले की, कल्याण दरवाजा, तानाजी कडा, राजगड पायवाट, गडाभोवतीची मेटं याविषयी सांगितलेल्या माहितीने सुप्रियाताई भारावल्या. ''मी पुन्हा एकदा खास वेळ काढून येईन आणि सिंहगडाचा सविस्तर इतिहास तुमच्याकडून जाणून घेईन’ असा शब्द दिल्याचे यांनी यावेळी सांगितले.

हेही वाचा: ENGvsWI 1st Test : सामन्याचे अपडेट्स अन् दिवसभरातील चर्चेतील बातम्या एका क्लिकवर

चर्चेतील महत्त्वाचे मुद्दे...

-पुरातत्त्व विभाग, जिल्हा परिषद, सार्वजनिक बांधकाम, पर्यटन विकास मंडळ यांच्या माध्यमातून सर्वांगीण विकासासाठी नियोजन करावे.

-विकास आराखड्यातील कामांचे प्रामुख्याने एक, तीन व पाच वर्ष असे वर्गीकरण करावे.

-सिंहगडावरील जिल्हा परिषदेच्या जागेवर पुरातत्त्वशी निगडित विश्रामगृहाची इमारत उभारावी.

-पर्यटक आणि स्थानिकांच्या मागण्यांचा एकत्रित विचार करावा.

-गडाचा गौरवशाली इतिहास लोकांपर्यंत प्रभावीपणे पोहचवावा.

-गडाची माहिती देणारे गाइड उपलब्ध करणे

-पर्यटनातून स्थानिकांना रोजगार निर्माण करणे

-वृक्षारोपण, स्वच्छता यांवर भर देणे.

loading image
go to top