Pune Census : जनगणना कर्मचाऱ्यांना पोलिस संरक्षण द्या; महापौर, आयुक्तांची मागणी

जनगणनेच्या कामादरम्यान महापालिका महिला कर्मचाऱ्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणावरून महापालिका प्रशासन आणि सत्ताधारी भाजप खडबडून जागे झाले आहे.
India Census

India Census

E sakal

Updated on

पुणे - शहरात सुरू असलेल्या जनगणनेच्या कामादरम्यान महापालिका महिला कर्मचाऱ्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणावरून महापालिका प्रशासन आणि सत्ताधारी भाजप खडबडून जागे झाले आहे. संवेदनशील भागात कर्मचाऱ्यांना पोलिस संरक्षण द्यावे, नागरिकांमध्ये जनजागृती करावी, नगरसेवकांनीही नागरिकांना सहकार्य करायचे आवाहन करावे अशी भूमिका महापौर मंजूषा नागपुरे यांनी घेतली. तर महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी या प्रकरणात गुन्हा दाखल केला असून, आरोपींना अटक करावी आणि आवश्यक तेथे पोलिस संरक्षण द्यावे अशी मागणी पोलिस आयुक्तांकडे केली असल्याचे सांगितले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com