esakal | ‘गिरिप्रेमीं’कडून ‘गंगोत्री-१’ मोहिमेसाठीचा ध्वज प्रदान
sakal

बोलून बातमी शोधा

campaign

‘गिरिप्रेमीं’कडून ‘गंगोत्री-१’ मोहिमेसाठीचा ध्वज प्रदान

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : ‘गिरीप्रेमी’ या गिर्यारोहण संस्थेकडून महिला गिर्यारोहकांसाठी सातत्याने मोहिमा आखण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून महिला गिर्यारोहकांच्या ‘गंगोत्री-१’ या मोहिमेसाठीचा ध्वज प्रदान सोहळा नुकताच पार पडला.

हेही वाचा: बदलीच्या ठिकाणी रुजू न अधिकाऱ्यांवर होणार कारवाई - आयुष प्रसाद

सेवासदन संस्थेच्या शाळेमध्ये घेण्यात आलेल्या कार्यक्रम प्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका राधिका ओगले यांच्या हस्ते महिला संघाला भारताचा तिरंगा ध्वज देण्यात आला. या प्रसंगी गिरीप्रेमीच्या संस्थापिका अध्यक्षा उषःप्रभा पागे, संस्थापक सदस्य आनंद पाळंदे, जयंत तुळपुळे तसेच गिरीप्रेमीचे ज्येष्ठ गिर्यारोहक अजित ताटे, चंदन चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते. यंदा गिरिप्रेमीची ही सलग तिसरी मोहीम असून गेल्याच महिन्यात संस्थेच्या महिलांची ‘कांगयात्से-१ आणि २’ ही मोहीम यशस्वी झाली.

हेही वाचा: ग्रामीण मार्गांवरील बसमार्गामुळे प्रवास सुखकर

‘गंगोत्री -१’ या मोहिमेचे नेतृत्व पूर्वा शिंदे-सिंग करत असून हे शिखर सहा हजार ६७२ मीटर उंच आहे. या संघात रितू चावला, सुनीता कोळके आणि स्नेहा तळवटकर या गिर्यारोहकांचा समावेश आहे. गंगोत्री-१ हे गंगोत्री शिखर समूहातील एक खडतर शिखर मानले जाते. संघाला बेस कॅम्पच्या पुढे आणखी दोन कॅम्प लावावे लागणार आहेत. वाटेतील टणक बर्फाची खडी चढण, हिमभेगा आणि सर्वांत शेवटी माथ्याजवळ पार करावी लागणारी ९० अंश कोनातील बर्फाची भिंत अशा आव्हांनाना या संघाला सामोरे जावे लागणार आहे. मोहिमेसाठी संघ पुण्याहून ४ सप्टेंबर रोजी रवाना होणार असून पुणे - उत्तरकाशी - गंगोत्री असा प्रवास करणार आहे. मोहिमेचा कालावधी २० ते २५ दिवसांचा असेल, अशी माहिती संस्थेतर्फे देण्यात आली.

यावेळी पागे यांनी त्यांच्या १९८१ मधील याच शिखरावरील प्री-एव्हरेस्ट म्हणून आखण्यात आलेल्या मोहिमेतील बछेंद्री पाल यांच्याबरोबर केलेल्या चढाईचे अनुभव सांगत या नव्या मोहिमेला शुभेच्छा दिल्या.

loading image
go to top