Pune Narhe News : पोलिस भरतीत नापास, पण समाजात ‘खाकी’चा रुबाब दाखवण्याचा प्रयत्न; नऱ्हेतील तरुणावर गुन्हा दाखल

पोलिस भरतीत निवड झाल्याचा खोटा बनाव रचून तरुणाने सोसायटीत पेढे वाटले, चौकात अभिनंदनाचे फलक लावले; खरे पोलिस घरी पोहोचताच खाकीचा खोटा रुबाब उघडकीस
नऱ्हेत 'खाकी'चा खोटा रुबाब! पोलीस भरतीत निवड झाल्याचा बनाव रचून पेढे वाटणाऱ्या तरुणाचे 'खऱ्या' पोलिसांनी फोडले बिंग

नऱ्हेत 'खाकी'चा खोटा रुबाब! पोलीस भरतीत निवड झाल्याचा बनाव रचून पेढे वाटणाऱ्या तरुणाचे 'खऱ्या' पोलिसांनी फोडले बिंग

Sakal

Updated on

पुणे : खाकी वर्दीचे आकर्षण तरुणाईला नेहमीच असते. पण, हेच स्वप्न जेव्हा अपूर्ण राहते, तेव्हा काही जण काय करतील याचा नेम नसतो. एका तरुणाने पोलिस भरतीत निवड झाल्याचा बनाव रचून चक्क सोसायटीत पेढे वाटले. चौकात स्वत:चे अभिनंदन करणारे बॅनरही झळकवले. मात्र, त्याचे कौतुक करण्यासाठी जेव्हा ‘खरे’ पोलिस दारात पोहोचले, तेव्हा या ‘बोगस’ पोलिसाचे बिंग फुटले. खाकी वर्दीचा खोटा रुबाब दाखवणे या तरुणाला चांगलेच महागात पडले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com