येरवडा मनोरुग्णालयामध्ये मानसोपचार अभ्यासक्रम

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 16 जानेवारी 2020

येरवडा प्रादेशिक मनोरुग्णालयात येत्या शैक्षणिक वर्षांपासून पदव्युत्तर मानसोपचार, परिचारिका चिकित्सालयातील मानसशास्त्र व मानसशास्त्रीय समाजसेवक हे प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू केले जाणार आहेत, अशी माहिती येरवडा प्रादेशिक मनोरुग्णालयाचे अधीक्षक डॉ. अभिजित फडणीस यांनी दिली. 

येरवडा -येरवडा प्रादेशिक मनोरुग्णालयात येत्या शैक्षणिक वर्षांपासून पदव्युत्तर मानसोपचार, परिचारिका चिकित्सालयातील मानसशास्त्र व मानसशास्त्रीय समाजसेवक हे प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू केले जाणार आहेत, अशी माहिती येरवडा प्रादेशिक मनोरुग्णालयाचे अधीक्षक डॉ. अभिजित फडणीस यांनी दिली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

येरवडा मनोरुग्णालयातील रुग्ण संख्या २५४० असून, सध्या येथे ९०० पुरुष व ६०० महिला उपचार घेत आहेत. नवीन अभ्यासक्रमाच्या आवश्‍यकतेबाबत डॉ. फडणीस म्हणाले, ‘‘रुग्णालयातील मानसिक रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन आरोग्य विभागाने केंद्राकडे पदविका व प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करण्याची परवानगी मागितली होती. केंद्र सरकारने तीन विषयांचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी परवानगी दिली. वैद्यकीय शिक्षण विभागाने तयार केलेल्या  पदव्युत्तर अभ्यासक्रमाला मान्यता मिळाली आहे.’’ 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाअंतर्गत असलेल्या कर्वे सामाजिक संस्थेतर्फे मानसशास्त्रीय समाजसेवक, परिचारिका चिकित्सालय मानसशास्त्र प्रमाणपत्र अभ्यासक्रम पहिल्या टप्प्यात सुरू करणार आहोत. त्यानंतर राज्य आणि केंद्राच्या मेडिकल कौन्सिलने पाहणी केल्यानंतर पदव्युत्तर मानसोपचार अभ्यासक्रम सुरू करणार असल्याचे फडणीस  यांनी सांगितले.

मनोरुग्णालयात अभ्यासक्रमाची गरज का?
    रुग्णाची मानसिक व शारीरिक चाचणी केली जाते.
    रक्त तपासणी, ईसीजी, एक्‍सरे काढला जातो.
     मनोरुग्णाला शॉक ट्रिटमेंट दिले जाते.
     रुग्णाच्या आजाराचे स्वरूप कळते.
    त्यानुसार त्याला योग्य त्या कक्षात ठेवले जाते.

येरवडा मनोरुग्णालयात येत्या शैक्षणिक वर्षापासून एम. फिल. सायकॅट्रिक सोशल वर्कर, डिप्लोमा इन क्‍लिनिकल सायकॅट्रिक नर्स हे कोर्सही सुरू होणार आहेत. त्यानंतर एमडी सायकॅट्रिक अभ्यासक्रमही सुरू होणार आहे.
- डॉ. अभिजित फडणीस,  अधीक्षक, येरवडा प्रादेशिक मनोरुग्णालय


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Psychotherapy Course in Yerwada Psychiatric Hospital

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: