
पुणे : ‘‘संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या वरिष्ठ शास्त्रज्ञांकडे वैज्ञानिक माहिती आहे, तर भारत फोर्जकडे मॅन्युफॅक्चरिंग ज्ञान आहे. त्यामुळे संरक्षण क्षेत्रातील मजबुतीकरणासाठी सरकार व खासगी क्षेत्र एकत्र पावले टाकत आहे. एकेकाळी भारताला पाश्चिमात्य देशांतील कंपन्यांच्या तोफा आयात कराव्या लागत होत्या. आता भारतीय बनावटीची अत्याधुनिक तोफ अमेरिका, युरोपीय देशांच्या लष्करात दाखल झाली आहे,’’ अशी माहिती ‘भारत फोर्ज लिमिटेड’चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक बाबा कल्याणी यांनी दिली.