
Girish Bapat : निधनाला २४ तासही उलटण्याच्या आतच गिरीश बापट यांचे जनसंपर्क कार्यालय सुरू
पुणे - पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचे बुधवारी दिर्घ आजाराने निधन झाले. मात्र बापट यांचं निधन होऊन 24 तास उलटण्याच्या आतच त्यांचे जनसंपर्क कार्यालय सुरू ठेवण्यात आले आहे.
रोजच्या वेळेनुसार साडेनऊ वाजता आजही गिरीश बापट यांचं जनसंपर्क कार्यालय सामान्य लोकांसाठी सुरू ठेवण्यात आले आहे. बुधवारी दुपारी गिरीश बापट यांचं निधन झालं असून रात्री त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
अशा स्थितीतही बापट यांच्या कुटुंबाकडून 24 तासाच्या आतच त्यांचं जनसंपर्क कार्यालय पुन्हा सुरू करण्यात आले आहे. त्यासोबतच जनसंपर्क कार्यालयातील दैनंदिन कामे देखील सुरूच ठेवण्यात आली आहेत.

कसब्याचे किंगमेकर म्हणून खासदार गिरीश बापट यांची ओळख होती. गेल्या काही दिवसांपासून बापट यांची प्रकृती चिंताजनक होती. त्यांच्यावर रुग्णलयात उपचार सुरु होते. संघ स्वयंसेवक, नगरसेवक ते खासदार असा त्यांचा राजकीय प्रवास होता.