पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणी माजी मंत्री संजय राठोड यांना क्लिनचीट?

पोहरादेवीच्या महंतांकडून मंत्रिपदाची मागणी
pooja chavansuicide case sanjay rathore pune police clean cheat
pooja chavansuicide case sanjay rathore pune police clean cheat

पुणे : राज्यभरात गाजलेल्या पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी माजी मंत्री संजय राठोड यांना पुणे पोलिसांनी क्लीन चिट दिली आहे. पोहरावदेवीच्या महंतांनी पोहरादेवीचे 6 महंत बाबू सिंह महाराज, कबीरदास महाराज, सुनील महाराज,जीतू महाराज, यशवंत महाराज, शेखर महाराज,आणि ऑल इंडिया बंजारा सेवा संघाचे अध्यक्ष शंकर पवार यांनी शनिवारी पुणे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची भेट घेत त्यांच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्यांची माहिती घेतली. पुणे पोलिसांनी पूजा चव्हाण आत्महत्या आकस्मित घडलेली असल्याचे सांगितले आहे. तसे समरी पत्रही या शिष्टमंडळाला दिले आहे. (pooja chavan suicide case sanjay rathore pune police clean cheat)

पुणे पोलिसांनी पूजा चव्हाण आत्महत्या आकस्मित घडलेली असल्याचे सांगत त्यांना या प्रकरणातून दोषमुक्त केले आहे. याचे समरी पत्रही महंताच्या शिष्टमंडळाला दिले. आता हे शिष्टमंडळ त्यांना पुन्हा मंत्रीपद मिळण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटणार आहे असे समजते. पूजा चव्हाण ही २२ वर्षीय तरूणी बीड जिल्ह्यातील परळीत राहत होती. परळीत पूजाचे आई-वडील राहतात. पूजाला ५ बहिणी त्यापैकी ४ बहिणींची लग्न झाली आहेत. काही महिन्यापूर्वी पूजा पुण्यात इंग्लिश स्पिकिंगच्या क्लासेससाठी आली होती. (pooja chavan suicide case)

वानवडीजवळील महमदवाडी येथे 7 फेब्रूवारीला पूजा चव्हाण या तरुणीने रात्री दीड वाजण्याच्या सुमारास गॅलरीतून उडी टाकली. तिच्या डोक्याला व मणक्याला गंभीर दुखापत झाली होती. विलास व अरुण तिचे भाऊ तिला घेऊन तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र दुखापत गंभीर असल्याने तिचा मृत्यू झाला होता. पूजाने महाविकास आघाडीमधील संजय राठोड याच्यमुळे मुळे आत्महत्या केल्याच्या चर्चा होत्या. त्यांच्यावर गुन्हे देखील दाखल होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com