पुणेकरांची चिंता पुन्हा वाढली; दिवसभरात सापडले तब्बल १३५ नवे रुग्ण!

Corona-Patients
Corona-Patients

पुणे : पुणेकरांनो आता पुन्हा चिंतेचे दिवस येऊ लागले आहेत. तुम्हाला स्वत:च्या घरात वावरण्यापासून सगळीकडेच खूप काळजी घ्यावी लागणार आहे; कारण गेल्या आठवड्यात कमी झालेल्या कोरोना रुग्णांचा आकडा झपाट्याने वाढून शनिवारी (ता.9) दिवसभरात 135 नवे रुग्ण सापडले आहेत.

आतापर्यंतचे हे सर्वाधिक रुग्ण असल्याने कोरोना पुन्हा पसरण्याची चिन्हे दिसून लागली आहेत. नव्या रुग्णांची वाढ होत असली तरी; कोरोनामुक्तांची संख्याही शंभरीपर्यंत गेली आहे. याच दिवसभरात 96 जण बरे झाल्याने त्यांना घरी सोडले आहे. 

दरम्यान, विविध रुग्णालयांतील चार कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांची एकूण संख्या 141 पर्यंत गेली आहे. तर 70 रुग्णांची स्थिती गंभीर असून, त्यातील 12 जणांना अतिदक्षता विभागात (आयसीयू) आहेत. 

शहरात गेल्या आठवड्यापर्यंत कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याची आकडे आहे. परंतु, हीच संख्या आठवड्यात कमी होत असल्याचे दिसून आले. त्यानंतर कोरोनापासून बरे होण्याचे प्रमाण वाढल्याने पुणेकरांना दिलासा मिळाला. मात्र शुक्रवारी (ता.8) आणि शनिवारी (ता.9) नवे रुग्ण वाढून या दोन दिवसांत 252 रुग्णांची भर पडली आहे. त्यात शनिवारी 135 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. याआधी एका दिवसांत 122 रुग्ण सापडले आहेत. 

सध्या सुमारे 2 हजार 380 रुग्णांची नोंद झाली असून, त्यातील 141 जणांचा मृत्यू झाला आहे. त्याशिवाय 826 रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे आजघडीला 1 हजार 414 जणांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 21 हजार 813 जणांची तपासणी करण्यात आली. त्यता दिवसभरात 1 हजार 1 हजार 543 नागरिकांच्या घशातील द्रव पदार्थांच्या नमुन्यांची तपासणी झाली आहे. एकूण 826 रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

शनिवारी सापडलेले रुग्ण 135
एकूण रुग्ण (नोंद) 2380 
रुग्णालयांत उपचार सुरू असलेले रुग्ण  1414 
सोमवारी बरे झालेले रुग्ण 96 
एकूण बरे झालेले रुग्ण  826 
एकूण मृत्यू  141

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com