पुण्यात सोशल मीडियावर चंद्रकांत पाटील पुन्हा टार्गेट; काय झालंय वाचा सविस्तर

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 9 May 2020

पुण्यातील कोथरूड मतदारसंघाच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांनी 'आज फिर दिल ने एक तमन्ना की, आज फिर दिल को हमने समझाया...' अशा ओळी फेसबुकवर पोस्ट केल्या आहेत. आज पुन्हा एकदा मनाची समजूत घातली,' असं त्यांनी म्हटलं आहे.

पुणे : भाजपने कालच आपल्या चार विधानपरिषदेच्या उमेदवारांची नावे जाहीर केली, त्यानंतर पक्षात एकच गोंधळ सुरु झाला आहे. अनेक इच्छूकांनी आपली नाराजीची प्रतिक्रीया सोशल मिडीयाव्दारे व्यक्त केली आहेत. भाजपच्या पुण्यातील माजी आमदार मेधा कुलकर्णी यांनी देखील आपला राग फेसबुकव्दारे व्यक्त केला आहे. त्यांनी एका कवितेच्या ओळी सोशल मीडियावर शेअर करून त्यांनी आपल्या भावना मांडल्या आहेत. आता त्यानंतर त्यांचे समर्थक त्यांच्या समर्थनार्थ मैदानात उतरले आहेत. समर्थकांनी आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांना टारगेट केले आहे. ते त्यांना सोशल मिडीयावर ट्रोल करताना दिसत आहेत. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

विधान परिषदेच्या ९ जागांसाठी लवकरच निवडणूक होणार आहे. यापैकी चार जागा निवडून आणण्याची संधी भाजपला आहे. या चार जागांसाठी भाजपच्या काही मोठ्या नेत्यांसह इतरही नावं चर्चेत होती. मात्र, शेवटच्या क्षणी पक्षानं नव्या चेहऱ्यांना संधी दिली. त्यामुळं डावलल्या गेलेल्यांची नाराजी आता समोर येऊ लागली आहे. यामध्ये माजी मंत्री पंकजा मुंडे, माजी मंत्री एकनाथ खडसे, चंद्रशेखर बावनकुळे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे इच्छूक होते, यांना तिकीट न मिळाल्याने हे सर्व नाराज असल्याची चर्चा सोशल मिडीयात आहे.

आणखी वाचा - महाराष्ट्रात राबवा बारामती पॅटर्न!

तसेच पुण्यातील कोथरूड मतदारसंघाच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांनी 'आज फिर दिल ने एक तमन्ना की, आज फिर दिल को हमने समझाया...' अशा ओळी फेसबुकवर पोस्ट केल्या आहेत. आज पुन्हा एकदा मनाची समजूत घातली,' असं त्यांनी म्हटलं आहे.

आणखी वाचा - मुंबई-पुण्यात पसरली अफवा; वाचा सविस्तर बातमी

कुलकर्णी यांना मागील निवडणुकीत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासाठी आपल्या जागेचा त्याग करावा लागला होता. त्यावरून बराच वादही झाला होता. कुलकर्णी यांच्या कार्यकर्त्यांनी पाटील यांच्या उमेदवारीला विरोध केला होता. मात्र, नेत्यांच्या मनधरणीनंतर कुलकर्णी यांनी माघार घेतली.

त्याचवेळी त्यांना विधान परिषदेच्या उमेदवारीचं आश्वासन दिलं गेल्याचं बोललं जात होतं. त्यामुळं यावेळी त्यांची वर्णी लागेल, अशी आशा होती. मात्र, त्यांची निराशा झाली. फेसबुक पोस्टच्या माध्यमातून त्यांनी हेच मांडलं आहे. आता त्यांना उमेदवारी न मिळाल्याने समर्थक चांगलेच चिडले आहेत. एका समर्थकाने तर आमच्या ताईंनी त्याग केला नसता तर हे महोद्य ग्रामपंचायत सदस्य पण झाले नसते असे लिहिले आहे. तसेच समर्थकांनी कुलकर्णी यांनी फेसबुकवर टाकलेल्या कवितांच्या ओळींचा आधार घेत आमदार चंद्रकांत पाटील यांना टारगेट केले आहे. यामुळे आता कोथरूड विधानसभा मतदार संघामध्ये चांगलेच राजकीय वातावरण तापले आहे.  

आणखी वाचा - पुण्यात आयटी कंपन्यांमध्ये सुरू झाली पगार कपात 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Medha Kulkarni supporters criticize MLA Chandrakant Patil