‘पीएमपी’च्या १५० फेऱ्या रद्द; दोन विमाने अर्धा तास उशिरा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Swargate Bus Stand

पुण्यासह उर्वरित पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे रस्ते वाहतुकीसह हवाई वाहतुकीवरही परिणाम झाला आहे.

‘पीएमपी’च्या १५० फेऱ्या रद्द; दोन विमाने अर्धा तास उशिरा

पुणे - पुण्यासह उर्वरित पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे रस्ते वाहतुकीसह हवाई वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. पुण्याहून नागपूरला जाणाऱ्या विमानास २५ मिनिटांचा उशीर, तर पुण्याहून चेन्नईला जाणाऱ्या विमानास ३० मिनिटांचा उशीर झाला. यासह पुण्याला येणाऱ्या एसटी वाहतुकीवरही मोठा परिणाम झाला आहे. कोल्हापूर, सोलापूर, सातारा, महाबळेश्वर, मुंबई व नाशिक आदी ठिकाणांहून येणाऱ्या एसटी गाड्यांना ३० ते ४० मिनिटांचा उशीर होत आहे. शहरात होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे ‘पीएमपी’चे सोमवारचे वेळापत्रक कोलमडले. ‘पीएमपी’च्या १५० फेऱ्या रद्द झाल्या. पुण्यात आठवड्यापासून पावसाचा जोर वाढत आहे. त्यामुळे अनेक रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. त्यात साचणाऱ्या पाण्यामुळे रस्ते वाहतूक मंदावली आहे. याचा सर्वाधिक फटका पीएमपीला आणि बाहेरून येणाऱ्या एसटी बसेसला बसला. पुण्याला येणाऱ्या तीन रेल्वेला उशीर झाला. यात काझीपेठ एक्सप्रेसला साडेसहा तास, हावडा-पुणे एक्स्प्रेससह भुसावळ-पुणे एक्सप्रेसला ३ तास १० मिनिटांचा उशीर झाला. मात्र हा उशीर पावसामुळेच झाला असल्याची पुष्टी झाली नाही.

काय परिणाम...

  • विविध रस्त्यांवर वाहतूक कोंडीमुळे ‘पीएमपी’चे मोठे नुकसान. फेऱ्या रद्द, उशिराने वाहतूक.

  • विमानांना अर्धा तास उशीर.

  • खासगी टॅक्सी आणि रिक्षांच्या मागणीत वाढ.

  • लोकलच्या फेऱ्या आणि मुंबईकडे होणारी रेल्वे वाहतूक सुरळीत.

रस्त्यावरील खड्ड्यांमुळे पुण्यातील वाहतुकीचा वेग खूपच मंदावला आहे. हडपसर भागात सोलापूर रस्त्यावर होणाऱ्या कोंडीमुळे अर्धा-एक तास वाया जातो. ऑफिसला जाणाऱ्या कर्मचाऱ्यांसह गृहिणींनाही याचा फटका बसतो.

- प्रतिज्ञा माने, प्रवासी

वाहतूक कोंडीचा फटका पीएमपीला बसतो. पीएमपीला उशीर झाला तर ऑफिसमध्ये पोहोचण्यास उशीर होतो, तसेच काही वेळा बस रद्ददेखील होते. त्याचा ताण त्या मार्गावरील दुसऱ्या बसवर येतो. सायंकाळच्या वेळी तर प्रवाशांना उभे राहण्यासही जागा नसते.

- अपेक्षा भोसले, प्रवासी

Web Title: Pune 150 Rounds Of Pmp Bus Canceled Two Planes Half An Hour Late From Rain

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :punerainwaterPMP Busplane
go to top