पुण्यात कोथरूडमधील तरुण सहाव्या मजल्यावरून खाली पडला; उपचारापूर्वीच मृत्यू 

टीम ई-सकाळ
सोमवार, 27 जानेवारी 2020

त्यांचा मुलगा खाली बेशुद्ध अवस्थेत पडल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी त्यास उपचारांसाठी तत्काळ ससून रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टारांनी घोषित केले.

पुणे : इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून खाली पडून 17 वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. ही घटना कोथरूडयेथीर कुमार परिसर येथे घडली. याप्रकरणी कोथरूड पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. रविवारी पहाटे ही घटना घडल्याची माहिती आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

आर्यन अखिलेश मुंगेकर (वय 17, रा. कुमार परिसर, कोथरूड) असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. याप्रकरणी आर्यनचे वडील अखिलेश मुंगेकर यांनी कोथरूड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंगेकर हे आयटी कंपनीमध्ये नोकरीस आहेत. तर, आर्यन हा बारावी विज्ञान शाखेत शिक्षण घेत होता. रविवारी पहाटेच्या सुमारास कुमार परिसर या सोसायटीत खाली एक मुलगा पडला असल्याचे तेथील सुरक्षारक्षकाने पाहिले. मात्र, मुलाची तत्काळ ओळख न पटल्याने सुरक्षारक्षकाने प्रत्येक मजल्यावर जाऊन खाली पडलेला मुलगा कोणाचा आहे, याचा शोध घेतला. मात्र, त्यांना माहिती मिळाली नाही. त्यानंतर ते सहाव्या मजल्यावर गेल्यानंतर त्यांनी मुंगेकर यांना एक मुलगा खाली पडल्याची माहिती दिली. त्यानंतर सर्वजण खाली आले. त्या वेळी मुंगेकर त्यावेळी मुंगेकर यांचा मुलगा तेथे नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यांनी खाली येऊन पाहिले. त्यानंतर त्यांचा मुलगा खाली बेशुद्ध अवस्थेत पडल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी त्यास उपचारांसाठी तत्काळ ससून रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टारांनी घोषित केले.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आणखी वाचा - गणेश जयंतीनिमित्त पुण्यात वाहतूक मार्गात बदल 

तत्पूर्वी, पोलिस नियंत्रण कक्षाद्वारे कोथरुड पोलिसांना माहिती मिळाली. त्यांनीही घटनास्थळी धाव घेतली. प्राथमिक चौकशीमध्ये मुलगा सहाव्या मजल्यावरून पडून त्याचा मृत्यू झाला असल्याचे कोथरुड पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक प्रतिभा जोशी यांनी सांगितले. या प्रकरणाचा कोथरुड पोलिसांकडून तपास केला जाणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pune 17 year boy collapse from sixth floor died kothrud