esakal | Pune : चार दशकांपासून जपला मोदकांचा व्यवसाय
sakal

बोलून बातमी शोधा

pune

Pune : चार दशकांपासून जपला मोदकांचा व्यवसाय

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

औंध : गणपती बापाच्या आवडीचा आणि गणेश चतुर्थीला सगळ्यात महत्त्वाचा पदार्थ म्हणजेच उकडीचे मोदक. मोदक हा सगळ्यांचाच आवडीचा पदार्थ, पण हा पदार्थ तुम्हाला वर्षाच्या बाराही महिने मिळाला तर... होय, औंध गावातील श्रीधर शिंदे यांच्या घरी संपूर्ण परिवार उकळीचे मोदक बनवतो. विशेष म्हणजे त्यांचे मोदक केवळ भारतातच नव्हे तर थेट परदेशातही पोचत आहेत.

शिंदे कुटुंबात १९८० पासून सुरू झालेला हा उकडीच्या मोदकांचा व्यवसाय श्रीधर यांनी ही कायम ठेवला आहे. याबाबत शिंदे म्हणाले, ‘‘सुमारे चार दशकांपासून माझे कुटुंब या व्यवसायात आहे. मोदक हा अनेकांच्या आवडीचा पदार्थ असल्याने लोकांना याचा आस्वाद बाराही महिने घेता यावा, या अनुषंगाने आजी-आजोबांनी मोदकाचा व्यवसाय सुरू केला होता. परंतु केवळ व्यवसाय म्हणून नाही तर कुटुंबाची परंपरा अशाच पद्धतीने पुढे चालत राहावी म्हणून मी नोकरी सोडली. आता आम्ही संपूर्ण कुटुंब मिळून मोदक तयार करतो, तर माझा मुलगाही बेकरी पदार्थ बनवतो.’’

कोरोना काळातही मोदकांची मागणी होती. सध्या मोदकांमध्ये वेगवेगळे प्रकार आणले आहेत. यात आंबा मोदक, गुलकंद, चॉकलेट, ड्रायफ्रूट, चीज अशा विविध प्रकारच्या मोदकांचा समावेश आहे, तर हे मोदक चेन्नई, गोवा, बंगळूर, हैदराबादसह दुबई, अमेरिकासारख्या देशातही पाठविले जातात, तर गणेशोत्सवादरम्यान आम्ही ११ ते १२ हजार मोदक बनवतो, असेही शिंदे यांनी सांगितले.

loading image
go to top