पुण्यातील २० टक्के हॉटेल पुन्हा बंद

pune 20 percent hotels closed again after night curfew
pune 20 percent hotels closed again after night curfew
Updated on

पुणे : शहरात लागू करण्यात आलेल्या रात्री आठनंतरच्या संचारबंदीमुळे येथील २० टक्के हॉटेल बंद झाले आहेत. सर्वाधिक व्यवसाय होत असलेल्या रात्री आठ ते १२ या वेळे दरम्यान सेवा बंद राहणार असल्याने हॉटेल काही दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे तेथील कामगारांचा रोजगार देखील बुडाला आहे.

कोरोनाचा फैलाव वाढत असल्याने प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून शहरात रात्री आठ ते सकाळी सात या वेळेत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे शहरातील सर्व हॉटेल रात्री आठ वाजता बंद केली जात आहेत. मुळात हॉटेल व्यावसायिकांचा २० ते ३० टक्के व्यवसाय हा रात्री आठपर्यंत व त्यानंतरच्या वेळेत सुमारे ७० ते ८० टक्के उलाढाल होते. मात्र, सर्वाधिक धंदा होत असलेल्या वेळेतच हॉटेल बंद राहिले तर नफा होणे दूरच दैनंदिन खर्च देखील भागवता येणार नाही. या चिंतेने ही हॉटेल बंद झाली आहेत. हॉटेल सुरू ठेवून खर्च वाढविण्यापेक्षा कामगारांना सुटी देण्यात आली आहे. तसेच अनेक कामगार हे पुन्हा लॉकडाउन होणार या भीतीने आपल्या गावी गेले आहेत, अशी माहिती पुणे रेस्टॉरंट ऍण्ड हॉटेलियर्स असोसिएशनने दिली. पार्सलला देखील प्रतिसाद मिळत नसल्याचे असोसिएशनने सांगितले.

खेड-शिवापूर टोल नाक्यावरून प्रवास करताय, मग ही बातमी नक्की वाचा

फोन केल्याशिवाय परत येऊ नका
हॉटेल सुरू करण्यास परवानगी दिली तेव्हा अनेक व्यावसायिकांनी स्वतः:च्या खर्चातून कामगारांना परत आणले होते. आता पुन्हा त्यांना पाठविण्यात येत आहे. त्यामुळे ते परत येतील की नाही शंका आहे. तसेच परत यायचे असल्यास आधी कॉल करा मग या, असे व्यावसायिकांनी स्पष्ट केले आहे. कारण संचारबंदीची मुदत वाढली तर कामगारांना पुण्यात आल्यानंतर रोजगार मिळेलच याबाबत शंका आहे, असे असोसिएशनचे म्हणणे आहे.

''अनलॉक सुरू झाल्यानंतर ऑगस्टमध्ये ५० टक्के हॉटेल्स सुरू झाले होते. डिसेंबरअखेरीस हा आकडा अगदी ८० ते ९० टक्क्यांच्या घरात आला होता. मात्र, संचारबंदीच्या नियमामुळे पुन्हा २० टक्के हॉटेल बंद झाले आहेत. आमचा ८० टक्के व्यवसाय हा रात्री आठ ते १२ दरम्यान होतो. त्याच काळात हॉटेल बंद ठेवणे परवडणारे नाही. त्यात जर लॉकडाउन झाला तर या क्षेत्राचे काही खरे नाही.''
- गणेश शेट्टी, अध्यक्ष, पुणे रेस्टॉरंट ऍण्ड हॉटेलियर्स असोसिएशन


अशी आहे स्थिती
- व्यवसाय होणार नाही या भीतीने २० टक्के व्यवसाय बंद
- कामगारांना दिली १५ एप्रिलपर्यंत सुटी
- अनेक कामगारांचा रोजगार बुडाला
- पार्सलला मिळेना प्रतिसाद
- लॉकडाउनच्या भीतीने कामगार पुन्हा गावी जाताय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com