Pune : चांदणी चौकातील सुधारणेसाठी मोजावे लागणार २५ कोटी

चांदणी चौकातील अरुंद पुलामुळे व महामार्गामुळे वाहतूक कोंडी होत होती.
chandni chowk
chandni chowk sakal

पुणे - चांदणी चौकात साडे आठशे कोटी रुपये खर्च करून उड्डाणपूल बांधल्यानंतरही पादचाऱ्यांची गैरसोय होत आहे. त्यामुळे महापालिकेने पादचाऱ्यांना येणाऱ्या अडचणींचा अभ्यास करून त्या दूर करण्यासाठी आराखडा तयार केला आहे. त्यामध्ये चार किलोमीटर लांबीचा पादचारी मार्ग निर्माण करणे, पादचारी पूल उभारला जाणार आहे. त्यासाठीचा खर्च किमान २५ कोटी रुपये असणार आहे. महापालिका आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय) यांच्यामध्ये संयुक्त बैठक झाल्यानंतर पुढील दिशा ठरणार आहे.

(लोकल ते ग्लोबल लेटेस्ट अपडेट मिळवा सकाळच्या व्हॉट्सअप चॅनेलवर फक्त एका क्लिकमध्ये)

चांदणी चौकातील अरुंद पुलामुळे व महामार्गामुळे वाहतूक कोंडी होत होती. त्यासाठी एनएचएआय, राज्य सरकार आणि महापालिकेतर्फे चांदणी चौकात उड्डाणपूल बांधण्यात आला. त्यामध्ये पुलाचे व महामार्गाचे रुंदीकरण करताना पर्यायी मार्ग उपलब्ध केले आहेत. चांदणी चौकात बावधन, पाषाण, कोथरूड, वारजे या भागातील सार्वजनिक वाहनांनी प्रवास करणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे. बस, रिक्षामधून उतरल्यानंतर या नागरिकांना महामार्ग ओलांडावा लागतो.

त्याच प्रमाणे इच्छित स्थळी जाण्यासाठी बरेच अंतर चालावे लागते. महिला, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे उड्डाणपुलासोबत पादचाऱ्यांसाठी व्यवस्था करावी अशी मागणी यापूर्वी देखील केली जात होती. पण त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. उड्डाणपुलाचे उद्‍घाटन झाल्यानंतर पादचाऱ्यांची गैरसोय होत असल्याची टीका करण्यात आल्याने एनएचएआय आणि महापालिकेचे डोळे उघडले.

chandni chowk
Pune News : भाटघर धरण १०० टक्के भरले

महापालिकेने यासाठी चांदणी चौकात अभ्यास करून समस्या आणि सुधारणा याचा आराखडा तयार केला आहे. महापालिकेला पादचारी मार्ग बांधण्यासाठी सुमारे १५ कोटी तर एनएचएआयला पादचारी पूल बांधण्यासाठी सुमारे १० कोटीचा खर्च अपेक्षीत आहे.

chandni chowk
Pune : ठाणे ,पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यांना जोडणाऱ्या माळशेज रेल्वे मार्गाचा प्रश्न लवकर मार्गी लावा प्रवाशांची मागणी

ही आहेत धोकादायक ठिकाणे

मुळशीकडे जाणाऱ्या रस्त्यावर पीव्हीआयटी येथे रस्ता ओलांडणे धोकादायक

मुळशीकडे जाणारे रस्ते एकत्र येतात, तेथे पादचाऱ्यांसाठी सुविधा नसल्याने धोका

मुळशीकडून येणारा उड्डाणपूल बावधनच्या बाजूला उतरतो तेथे रिक्षा, बस थांबत असल्याने वाहतूक कोंडी

एनडीए पाषाण पुलाच्या दोन्ही बाजूला पादचाऱ्यांच्या सुरक्षेचा विचार नाही

एनडीए पाषाण पुलाच्या खालच्या बाजूला मुंबई व साताऱ्याकडे जाणाऱ्या बस रस्त्यात थांबत आहेत

येथून महामार्ग ओलांडणे धोकादायक

बावधनकडून कोथरुडकडे जाण्यासाठी पादचाऱ्यांसाठी सुविधा नाही

बावधन सर्कल, एनडीए चौकात पादचारी मार्ग नाही

या आहेत उपाययोजना

चांदणी चौकातील आठ मार्ग, त्यांच्या परिसरातील रस्त्यावर पादचारी मार्ग बांधणे

महामार्ग ओलांडण्यासाठी पादचारी पूल आवश्‍यक

पादचारी पुलावर चढण्यासाठी, उतरण्यासाठी चार ठिकाणी जिने

बावधन ते कोथरूड या दरम्यान महामार्गाला समांतर पादचारी पूल

सातारा, मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या बससाठी बसथांब्याची सोय

पादचारी पूल व नियोजित शिवसृष्टी एकमेकांशी जोडले जाणार

वेद भवनच्या जवळ पादचाऱ्यांना रस्ता ओलांडण्यासाठी सुविधा

चांदणी चौक परिसरात चार किलोमीटरचे पादचारी मार्ग निर्माण आवश्‍यक

chandni chowk
Pune Crime : छळास कंटाळून पेट्रोल ओतून घेतलेल्या महिलेला पतीने पेटवले

‘‘चांदणी चौकातील पादचाऱ्यांच्या समस्येसंदर्भात महापालिकेने अभ्यास केला आहे. यामध्ये ४ किलोमीटर लांबीचे पादचारी मार्ग, पादचारी मार्गांना जोडणारा व महामार्ग ओलांडता येईल असा पादचारी पूल प्रस्तावित केला आहे. पादचारी मार्ग वगळता इतर कामासाठी किमान १५ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षीत आहे.’’

निखिल मिजार, वाहतूक नियोजन सल्लागार, महापालिका

पादचारी पुलासाठी बैठक

पादचाऱ्यांसाठी सुविधा निर्माण करताना एनएचएआय आणिमहापालिकेत समन्वय आवश्‍यक आहे. पादचारी पूल उभारला जाईल असे यापूर्वी एनएचएआयने स्पष्ट केले आहे, पण त्याचा खर्च किती असेल हे अद्याप स्पष्ट नाही. यासंदर्भात महापालिका व एनएचएआयच्या अधिकाऱ्यांमध्ये बैठक होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com