pune
punesakal

Pune Crime : छळास कंटाळून पेट्रोल ओतून घेतलेल्या महिलेला पतीने पेटवले

पती अक्षय मारुती कुंजीर आणि सासू आशा मारुती कुंजीर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
Published on

पुणे - दारुच्या नशेत मारहाण करणाऱ्या पतीला भीती दाखविण्यासाठी अंगावर पेट्रोल ओतून घेतलेल्या महिलेला पतीने पेटवून दिल्याची घटना लोणी काळभोर परिसरात घडली. यात महिला गंभीर जखमी झाली आहे.

(लोकल ते ग्लोबल लेटेस्ट अपडेट मिळवा सकाळच्या व्हॉट्सअप चॅनेलवर फक्त एका क्लिकमध्ये)

या प्रकरणी अमृता अक्षय कुंजीर (वय २३, रा. वळती, ता. हवेली) यांनी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पती अक्षय मारुती कुंजीर आणि सासू आशा मारुती कुंजीर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे

.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमृता आणि अक्षय कुंजीर यांचे २०२० मध्ये लग्न झाले आहे. अक्षय दारू पिऊन पत्नीला मारहाण करीत होता. अक्षयने १२ सप्टेंबरला दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास दारुच्या नशेत घरातील सामानाची तोडफोड केली.

pune
Beed : ‘होल वावर इज आवर’ म्हणत भरला पीकविमा २७४ बोगस शेतकऱ्यांची करामत ६४ कोटी हडपण्याचा डाव उघड

त्यानंतर पत्नीला घरातून निघून जा, असे सांगितले. त्यावर पत्नीने छळास कंटाळून मी मरुन जाते, असे म्हणत घरात शेतीपंपासाठी आणलेले पेट्रोल अंगावर ओतून घेतले. त्यावेळी पतीने काडीपेटीने आग लावून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. त्यात अमृता गंभीर जखमी झाली असून, तिच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर सासू आशा कुंजीर यांनी हा प्रकार कोणाला सांगू नको, असे म्हणत सुनेला दमदाटी केली.

pune
Pune News : भाटघर धरण १०० टक्के भरले

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com