Pune Fire : पुण्यात अग्नितांडव सुरूच, आयटी पार्कला लागलेल्या भीषण आगीत 30 जण अडकले, सुटकेचे प्रयत्न सुरूच

Pune Fire
Pune Fireesakal

पुणेः पुण्यामधून आगीची एक मोठी घटना समोर आली आहे. येथे एका इमारतीला अचानक भीषण आग लागली आहे. आगिमुळे धुराचे लोट हवेत दुरवर पसरले आहेत. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहचल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरु आहे.

(Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, कल्याणीनगर येथील मारीगोल्ड आयटी पार्क येथे ही घटना घडली आहे. अग्निशमन दलाकडून उंच शिडीची ब्रॉन्टो व इतर चार अग्निशमन वाहने दाखल झाली आहेत. आग लागल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आणि जीव वाचवण्यासाठी अनेकांनी गच्चीवर धाव घेतली. इमारतीत गच्चीवर अडकलेल्या 4 नागरिकांची सुटका झाली आहे. तर अजून काही नागरिक इमारतीत अडकल्याची शक्यता आहे.

Pune Fire
मुंबईत घातपाताची शक्यता! पाच किंवा अधिक व्यक्तीना एकत्र येण्यास प्रतिबंध, पोलिसांनी उचलले मोठे पाऊल

अग्निशमन अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, टेरेसवर जवळपास ३० लोक अडकले आहेत. त्यांची सुटका करण्यासाठी अग्निशमन दलाकडून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

Pune Fire
Wrestlers Protest: "छातीवर गोळ्या झेलू, पाठीवर नाही!" रिटायर्ड IPS ऑफिसरच्या धमकीवर बजरंग गरजला!

दरम्यान काल मध्यराञी अग्निशमन दल नियंत्रण कक्षात मार्केटयार्ड, गोल मार्केट येथील एका गोडाऊनमधे आग लागल्याची माहिती मिळाली. त्याचवेळी अग्निशमन वाहन घटनास्थळी दाखल झाले.

गोडाऊनमधे कागद रद्दी व काही प्रमाणात पुठ्ठा असणाऱ्या मालाला मोठ्या प्रमाणात आग लागली आहे. जवानांनी तातडीने गोडाऊनचा मुख्य दरवाजाचे बोल्ड कटरच्या साह्याने कुलुप तोडत चोहोबाजूंनी पाण्याचा मारा सुरू करून आतमधे कोणी कामगार अथवा नागरिक अडकला नाही ना याची ही खाञी केली. आग मोठी असल्याने जवानांनी अग्निशमन वाहनांना पाचारण केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com