CM Fadnavis to inaugurate and launch ₹3000 crore Pune development works ahead of PMC elections.
sakal
पुणे : विधीमंडळाचे अधिवेशन संपल्यानंतर महापालिका निवडणुकीची आचारसंहिता कधीही लागू शकते अशी स्थिती आहे. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर शहरातील विकास कामांचे भूमिपूजन आणि पूर्ण झालेल्या कामांच्या उद्घाटनाच्या निमित्ताने राज्यातील सत्ताधारी भाजपतर्फे जोरदार शक्तीप्रदर्शन करण्याची तयारी सुरु आहे. सोमवारी (ता. १५) होणाऱ्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये तब्बल तीन हजार कोटी रुपयांच्या कामांचा धडाका लावला जाणार आहे. या कार्यक्रमात सुमारे ३ हजार कोटीच्या कार्यक्रमाचा शुभारंभ आणि उद्घाटन होणार आहे.