

Pune Fraud Case
ESakal
पुणे : पुण्यातील सिंहगड रोड परिसरातील एका ३२ वर्षीय महिलेला लग्नाचे आमिष दाखवून तब्बल २१ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. इतकचं नाही तर तिला पैसे परत देतो असे सांगत आरोपीने चक्क खेळण्यातल्या नोटा दिल्या. याप्रकरणी एका ३२ वर्षीय महिलेने सिंहगड रस्ता पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्यावर पोलिसांनी गोरखनाथ गावंडकर याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.