Pune:इंदापूर तालुक्यात 39 वासरांची सुटका; इंदापूर पोलीसांची कारवाई

1 हजार रुपये असे एकूण 39 हजार रुपये किमतीची वासरे कत्तल करण्याच्या उद्देशाने चारा पाण्याची सोय न करता दाटीवाटीने निर्दयतेने कोंबुन घेवून जाताना मिळून याप्रकरणी इंदापूर पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
इंदापूर : पोलीसांनी कत्तलखान्यात नेण्यात येत असलेल्या गाई म्हशीची केली सुटका
इंदापूर : पोलीसांनी कत्तलखान्यात नेण्यात येत असलेल्या गाई म्हशीची केली सुटका sakal

इंदापूर तालुक्यातील वडापुरी काटी मार्गावर कत्तल करण्यासाठी चालवलेल्या 39 लहान वासरांचा पिकअप टेम्पो इंदापूर पोलिसांनी पकडला.याप्रकरणी एका जणांवर गुन्हा दखल करण्यात आला आहे.

याबाबत इंदापूर पोलिस स्टेशनचे पोलिस नाईक सलमान खान यांनी दिलेल्या फिर्यादिनुसार शनिवार (ता.08) रोजी सायंकाळी खान हे आपल्या सरकारी वाहनातून इंदापूर अकलूज रोडवर पेट्रोलिंग करत असताना वडापुरी - काटी मार्गावर समिर रफिक बेपारी (वय 25 वर्षे, रा.कसाबगल्ली इंदापूर, ता. इंदापुर जि. पुणे) याने त्याच्या ताब्यातील

इंदापूर : पोलीसांनी कत्तलखान्यात नेण्यात येत असलेल्या गाई म्हशीची केली सुटका
Pune Politics News : पुणे लोकसभा पोटनिवडणूक लढवणार का? रवींद्र धगेंकरांनी दिलं उत्तर

पांढऱ्या रंगाचा महिंद्रा पिकअप टेम्पो (नं. MH-42M8965) च्या हौद्यामध्ये 39 जर्सी गायीची वासरे प्रत्येकी किंमत 1 हजार रुपये असे एकूण 39 हजार रुपये किमतीची वासरे कत्तल करण्याच्या उद्देशाने चारा पाण्याची सोय न करता दाटीवाटीने निर्दयतेने कोंबुन घेवून जाताना मिळून याप्रकरणी इंदापूर पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस अधिकारी दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार माने करत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com