

Pune Warden Tender
esakal
पुणे : पुणे शहरातील वाहतूक नियंत्रित करण्यासाठी तातडीची बाब म्हणून विविध विभागांनी ५०० वॉर्डन घेण्यासाठी तातडीने मान्यता दिली होती. हा प्रस्ताव स्थायी समितीने मान्य करून ठेकेदाराला काम करण्याचे आदेश दिले. २२५ वॉर्डनची नियुक्तीही पूर्ण झाली. मात्र, या ठेकेदाराबाबत तक्रार आल्याने आयुक्त नवलकिशोर राम यांनी यू-टर्न घेत या ठेकेदाराच्या कामाला स्थगिती देऊन संबंधित आरोपांची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
वाहतूक पोलिसांनी महापालिकेकडे वॉर्डनची मागणी केली होती. त्यामुळे महापालिकेच्या सुरक्षा विभागाने निविदा प्रक्रिया सुरू केली होती. पण काही दिवसांपूर्वी कात्रज-कोंढवा रस्त्यावर दुचाकीचा अपघात होऊन विद्यार्थिनीचा मृत्यू झाला. त्यावरून महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत नगरसेवकांनी प्रशासनावर टीकेची झोड उठवली.
त्या वेळी निविदेत वेळ वाया जाऊ न देता विनानिविदा तातडीची बाब म्हणून मे. जयशंकर असोसिएट या ठेकेदाराला ५०० वॉर्डन पुरविण्याचे सुमारे १८ कोटी रुपयांचे काम देण्यात आले होते.
दरम्यान, आरोग्य विभागात चुकीचे काम केल्याबद्दल मे. जयशंकर असोसिएट या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्यात आले होते. त्याचा शिक्षेचा कालावधी संपल्यानंतर वॉर्डन पुरविण्याचे काम देण्यात आले होते. काळ्या यादीतील ठेकेदाराला काम देण्यात आले, असे आरोप तसेच ‘६७ ३ क’ या कलमाचा गैरवापर करून वर्षभरासाठी निविदा दिली.
या ठेकेदाराकडे आवश्यक परवाने नाहीत, असाही आरोप सोशल मीडियातून करण्यात आला. त्यामुळे आयुक्त राम यांनी या निविदेला स्थगिती दिली. या प्रकरणाची सखोल चौकशी करून पुढील लेखी अहवाल प्राप्त होत नाही, तोपर्यंत संबंधित ठेकेदाराकडून काम करून घेऊ नये; अन्यथा कारवाई केली जाईल, असे आदेशात नमूद केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.