esakal | पुणे : बिबट्याचा दुचाकीवर हल्ला; चुलता- पुतण्या बचावले
sakal

बोलून बातमी शोधा

Pune

पुणे : बिबट्याचा दुचाकीवर हल्ला; चुलता- पुतण्या बचावले

sakal_logo
By
युनूस तांबोळी ः सकाळ वृत्तसेवा

टाकळी हाजी : पावसाळी वातावरणात रात्रीचा अंधार होता...दुचाकीवरून मी आणी माझा पुतण्या जांबुत कडे चाललो होतो. अंधारात दबा धरून बसलेल्या बिबट्याने माझ्याकडे झेप टाकली. मी सावधच होतो पण त्याच्या हल्ल्याने पायाला त्याचे नख लागले.

पुतण्याला पण पायाला ओरखडले. सावध असल्याने गाडी तशीच पुढे गाजरे छापला येऊन थांबवली. यावेळी पायातून रक्त चालले होते. वेळ आली होती पण काळ आला नव्हता. असा घाबरलेल्या स्वरात फाकटे ( ता. शिरूर ) येथील गोरक्ष शेलार बिबट्याने केलेल्या हल्ल्याची माहीती दिली. जांबूत ( ता. शिरूर ) येथील पंचतळे वरून जांबूत कडे गोरक्ष शेलार (वय 36 ) व त्यांचा पुतण्या नवनाथ शेलार ( वय 12 ) दुचाकीवरून जात होते. रात्रीच्या अंधारात दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला. चालत्या दुचाकीवर बिबट्याने हल्ला केल्याने दोघांच्याही उजव्या पायाला गुडघ्याच्या खाली नख्या ओरखडल्याने जखमा झाल्या होत्या. बिबट्याने हल्ला केल्याची माहिती वनविभागाला कळविण्यात आली.

हेही वाचा: 'माझं सुटलेलं पोट त्यावेळी का नाही दिसलं?'; मलिंगाचा सवाल

त्यावेळी वनपाल चारूशिला काटे, वनरक्षक सविता चव्हाण यांनी संबधित ठिकाणी तातडीने भेट दिली. त्यानंतर टाकळी हाजी ( ता. शिरूर ) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचारासाठी त्यांना नेण्यात आले. आरोग्य केंद्राचे वैद्यकिय अधिकारी डॅा. प्रदिप बिक्कड यांनी प्राथमिक उपचार करून त्यांना ससून रुग्णालय पुणे येथे पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले होते. पुणे येथे त्यांच्यावर लस व उपचार करण्यात आल्याचे शिक्षक बाळासाहेब दरेकर यांनी सांगितले. या परीसरात बिबट्यांची संख्या वाढली असून बिबटे जेरबंद करा अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

हेही वाचा: मुख्यमंत्र्यांकडून ज्येष्ठ साहित्यिक द. मा. मिरासदार यांना श्रद्धांजली

वनविभागाचे दुर्लक्ष...

मागिल काळात जांबूत ( ता. शिरूर ) येथे दोन वर्षाच्या स्त्रुती योगेश जोरी हिच्यावर बिबट्याने हल्ला करून ठार केले होते. त्यानंतर माजी पंचायत समिती सदस्य वासुदेव जोरी यांच्या पत्नी लता जोरी यांच्यावर बिबट्याने हल्ला करून जख्मी केले होते. त्यानंतर याच परिसरात शेलार यांच्या दुचाकीवर हल्ला ही घटना घडली आहे. तरीदेखील या परीसरात वनविभागाचे दुर्लक्ष असल्याने नागरिकांमध्ये बिबट्याच्या वावरामुळे भितीचे वातावरण आहे.

loading image
go to top