Pune Accident : मार्केट यार्ड परिसरात अपघात; मोटारीच्या धडकेत दुचाकीस्वार महिलेचा मृत्यू
Accident News : पुण्यातील मार्केट यार्ड परिसरात भरधाव कारच्या धडकेने दुचाकीस्वार ३३ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला असून, संबंधित चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुणे : मार्केट यार्ड परिसरात भरधाव मोटारीची पाठीमागून जोरदार धडक बसल्याने दुचाकीस्वार महिलेचा मृत्यू झाला. ही घटना मार्केट यार्ड परिसरात कांचनगंगा सोसायटीजवळ घडली.