

Pune Accident News: उदापूर ता.जुन्नर गावच्या हद्दीत कल्याण अहिल्यानगर महामार्गावर हॉटेल निमंत्रण समोर कार आणि दुचाकीच्या अपघात एक जण जागीच ठार झाला तर एक गंभीर जखमी झाला आहे.
हा अपघात सोमवारी ता.६ रात्री सव्वा दहा दरम्यान झाला असून यात दुचाकीवरील प्रेमा भरत घोडेकर वय.२५ रा.ओतूर ता.जुन्नर जि.पूणे हा तरुण जागीच ठार झाला आहे.तर कार मधील यश चव्हाण रा.शिरोली (नाव व पत्ता पुर्ण समजू शकला नाही.)हा गंभीर जखमी झाला आहे.