

Summary
पुण्यातील लोणी काळभोर येथे सोसायटीच्या आवारात ५ वर्षांच्या चिमुकल्याचा भरधाव कारखाली मृत्यू झाला.
निष्कर्ष आश्वत स्वामी हा मुलगा सायकल चालवत असताना कारची धडक बसली.
ही संपूर्ण घटना सोसायटीतील CCTV कॅमेऱ्यात कैद झाली असून व्हिडिओ व्हायरल होत आहे.
Child Death Pune: पुण्यातील लोणी काळभोरमध्ये एक अत्यंत एक अत्यंत हृदय विदारक घटना घडली आहे. लोणी काळभोर येथील जॉय नेस्ट सोसायटीमध्ये पाच वर्षांच्या निष्कर्ष आश्वत स्वामी या चिमुकल्याला सोसायटीच्या आवारात सायकल चालवत असताना भरधाव कारने धडक दिली. या अपघातात मुलाचा जागीच मृत्यू झाला. ही संपूर्ण घटना सोसायटीतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.