

CCTV footage captures a speeding container truck ramming vehicles on Pune’s Navale Bridge, causing a massive fire and multiple fatalities.
esakal
Summary
पुण्यातील नवले पुलावर भीषण अपघात झाला ज्यात ८ जणांचा मृत्यू झाला.
नवीन CCTV फुटेजमध्ये कंटेनरने चारचाकीला धडक दिल्यानंतर आग लागल्याचे दिसते.
ब्रेक फेल झालेल्या ट्रकने १० ते १५ वाहनांना जोरदार धडक दिली.
पुण्यातील नवले पुलावर गुरुवारी संध्याकाळी भीषण अपघात झाला यात आठ जणांना आपला जीव गमावावा लागला. काळजाचा थरकाप उडवणारा अपघात सीसीटीव्हीत कैद झाला असून आता या अपघाताचे आणखी एक सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. यात वेगाने येणाऱ्या कंटनेरन चारचाकीला पाठीमागून धडक दिल्यानंतर आग लागली अन् पुढे ट्रकला धडक दिल्याचे दिसत आहे. कंटेनर आणि ट्रकच्या मध्ये कार जळताना दिसत आहे.