
आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरकडे निघालेल्या वारकऱ्यांमध्ये एक दुर्दैवी घटना घडली आहे. कुदळवाडी परिसरात एका वाहनाने रस्त्याने चालणाऱ्या वारकऱ्याला उडवल्याने तो गंभीर जखमी झाला आहे. ही घटना सकाळी सुमारे ११.३० वाजण्याच्या सुमारास घडली. अपघातानंतर जखमी वारकऱ्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.